चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा यांच्याबद्दल भाजपचा मोठा निर्णय, काढलं 'हे' परिपत्रक...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 13 February 2020

गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती ती भाजपमधील अंतर्गत बदलांची. फडणवीस दिल्लीत जाणार, चंद्रकांत पाटील विरोधीपक्ष नेते होणार, पंकजा मुंडे यांचं प्रमोशन होणार आणि त्या महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष होणार इत्यादी इत्यादी...

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती ती भाजपमधील अंतर्गत बदलांची. फडणवीस दिल्लीत जाणार, चंद्रकांत पाटील विरोधीपक्ष नेते होणार, पंकजा मुंडे यांचं प्रमोशन होणार आणि त्या महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष होणार इत्यादी इत्यादी...

मात्र,  महाराष्ट्र भाजपच्या गोटातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येतेय. ही बातमी आहे महाराष्ट्राचे सध्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुंबई प्रदेशाध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांची. चंद्रकांत पाटील हेच महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहणार आहेत. एका प्रसिद्धिपत्रकाच्या माध्यमातून भाजपच्या  राष्ट्रीय नेतृत्त्वाकडून याबाबत माहिती देण्यात आलेली आहे. 

मोठी बातमी - 'हे' ११ नगरसेवक करणार राष्ट्रवादीत घरवापसी; गणेश नाईकांना मोठा धक्का..

याचसोबत मुंबईच्या भाजप प्रदेशाध्यक्षपदी देखील कुणाची नियुक्ती होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं. मुंबई भाजप प्रदेशाद्यक्षपदी मराठी चेहरा भाजपकडून देण्यात येईल अशा मोठ्या चर्चा होत्या. पुन्हा आशिष शेलार यांची मुंबई भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होणार असं देखील बोललं जात होतं. अशात मंगलप्रभात लोढा हेच या पुढे देखील मुंबई भाजपचे प्रदेशाध्यक्ष असतील.

मोठी बातमी - कांदाभजी चाहत्यांसाठी खुशखबर; सुटलाय पुन्हा घमघमाट

Image may contain: text

 

एकंदरच भाजपकडून दोन अत्यंत महत्त्वाच्या नियुक्त्या करण्यात आल्यात.  भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी याबाबत एक परिपत्रक काढत महाराष्ट्रातील 'या' नियुक्त्यांबद्दल माहिती दिली आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर भाजपमध्ये पक्षांतर्गत बदल केले जाणार अशी चर्चा होती. दरम्यान या सर्व चर्चांना तूर्तास तरी पूर्णविराम लागलाय असं म्हंटल जाऊ शकतं. 

bjp president j p nadda took very important decision about chandrakant patil and mangalprabhat lodha


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp president j p nadda took very important decision about chandrakant patil and mangalprabhat lodha