भाजप प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीला जे. पी.नड्डांची उपस्थिती 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जुलै 2019

तत्पूर्वी सकाळी कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे वाजता चैत्य भूमी, स्वा. सावरकर स्मारक आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळ येथे भेट देऊन अभिवादन केले. त्यानंतर १० वाजता ते बूथ सदस्यता कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.

मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यसमितीची विशेष बैठक गोरेगाव येथील नेस्को संकुल येथे झाले असून, या बैठकीचे उद्घाटन कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आदींच्या उपस्थितीत झाले.

तत्पूर्वी सकाळी कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे वाजता चैत्य भूमी, स्वा. सावरकर स्मारक आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळ येथे भेट देऊन अभिवादन केले. त्यानंतर १० वाजता ते बूथ सदस्यता कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.

या बैठकीला नड्डा यांच्या मार्गदर्शनाबरोबरच नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे अध्यक्षीय भाषण होईल. त्याशिवाय प्रदेश प्रभारी सरोज पांडे हे मार्गदर्शन करणार आहेत. राज्याचे वित्तमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि महिला व बालकल्याणमंत्री पंकजाताई मुंडे राजकीय प्रस्ताव मांडणार आहेत. तर प्रदेश सरचिटणीस आ. सुजीतसिंह ठाकूर हे महाजनादेश यात्रेविषयी माहिती थोड्याच वेळात देणार आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP president JP Nadda attend BJP Maharashtra meeting in Mumbai