
J P Nadda : मुंबईत भाजप राष्ट्रीय अध्यक्षांच्या कार्यक्रमात बत्ती गुल! मग कार्यकर्त्यांनी…
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे आज, १७ मे मुंबई दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नड्डा यांचा मुंबई दौरा महत्वाचा मानला जात आहे. तसचे आगामी मुंबई महापालिका निवडणूक तयारीच्या दृष्टीनेही भाजप रणनीती आखत आहे. दरम्यान आज बुधवारी नड्डा हे मुंबईत दाखल झाले आहेत.
जे पी नड्डा यांच्या दौऱ्याचा भाग असलेल्या मुंबईतील कांदिवली येथे झालेल्या भाजपच्या कार्यक्रमात बत्ती गुल झाल्याचा प्रकार समोर आला आहे. कांदिवली येथे भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपच्या पन्ना प्रमुखांच्या कार्यक्रम सुरू होता. मात्र या कार्यक्रमात अचानक वीज गेली. मात्र कार्यक्रम सुरू असताना अचान लाइट गेल्याने कार्यकर्त्यांनी मोबाईल टॉर्च लावून कार्यक्रम सुरू ठेवला. यानंतर थोड्याच वेळात लाईट परत आली असं सांगण्यात येत आहे.
भाजपचे राष्ट्रीच अध्यक्ष दोन दिवसांच्या मुबंई दौऱ्यावर आहेत. या दोन दिवसांत त्यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठीच आज दुपारी जे पी नड्डा यांचं मुंबईतील विमानळावर आगमन झालं. त्यानंतर जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत सुरु असलेल्या भाजपच्या पन्ना प्रमुख्यांच्या कार्यक्रमादरम्यान लाइट गेल्याचा हा प्रकार घडला.
कर्नाटकमधील निवडणुका पूर्ण झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने (BJP) आता आगामी निवडणूकांची तयारी सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून बूथ स्तरावर मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.