मुंबईत उभारणार तीन गोशाळा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016

मुंबई : मुंबईत तीन ठिकाणी गोशाळा स्थापन करून, त्यासाठी प्रत्येकी 10 हजार चौरस मीटर इतक्‍या जागांचे आरक्षण विकास आराखड्यात ठेवण्यासाठी भाजप आग्रही आहे. पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सोमवारी (ता. 24) त्याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी आला होता. मात्र, अपुऱ्या माहितीमुळे हा प्रस्ताव परत पाठविला. भाजपने आपला निवडणूक अजेंडा राबविण्यास सुरुवात केली आहे. 

गोशाळेसाठी मुंबईत जागा नाही. रस्त्यांवर गाई भटकत असल्याने त्याचा वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे त्यांच्यासाठी मुंबईत जिल्हावार तीन ठिकाणी गोशाळा उभारण्याची मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी केली. गोशाळा हा मुद्दा भाजपच्या निवडणूक अजेंड्यावर असल्याने सुधार समितीचे अध्यक्ष प्रकाश गंगाधरे या मागणीसाठी पाठपुरावा करीत आहेत. गोशाळेसाठी विकास आराखड्यात आरक्षणे ठेवा, समितीत सादर झालेल्या प्रस्तावातील 'कोंडवाडा' हा शब्द वगळा, कोंडवाडा गोशाळा होऊ शकत नाही; त्यामुळे हा प्रस्ताव परत पाठवून, तो सुधारित करून पुन्हा आणा, असे निर्देश त्यांनी आज प्रशासनाला दिले. गोशाळेसाठी विकास आराखड्यात जागा मिळाल्यास स्थानिक नागरिक गोशाळेत जाऊन, गाईंची देखभाल करतील, त्यांना चारा देतील. त्यामुळे त्या रस्त्यांवर फिरणार नाहीत, अशी माहिती त्यांनी दिली. मुंबईत पांजरापूर येथे भटकी जनावरे ठेवण्यासाठी कोंडवाडा आहे; मात्र गोशाळा नाही. त्यामुळे भाजपच्या अजेंड्यावरील गोशाळा हा मुद्दा सुधार समितीत मंजूर होऊ शकला नसला तरी पुढच्या बैठकीत त्याला मंजुरी मिळण्याची शक्‍यता आहे. 

डॉग शेल्टरही उभारा 
भटक्‍या कुत्र्यांची संख्या वाढत असून, श्‍वानप्रेमींची संख्या मुंबईत मोठी आहे. गोशाळेच्या धर्तीवर भटक्‍या कुत्र्यांचे संगोपन करण्यासाठी, तसेच त्यांना खाऊ घालण्यासाठी डॉग शेल्टर उभारण्याची सूचना सुधार समितीचे अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांनी केली. 

Web Title: BJP proposes to start three Gau-Shala in Mumabi