'राहुल गांधी माफी मागो', राफेलवरून भाजप आक्रमक

bjp to protest against congress leader rahul gandhi on rafale allegations
bjp to protest against congress leader rahul gandhi on rafale allegations

मुंबई : लोकसभा निवडणुकीत राफेल विमान खरेदीतील किथीत गैरव्यवहाराचा मुद्दा गाजला. त्यावर सुप्रिम कोर्टाने मोदी सरकारला क्लीन चीट दिली आहे. आता यावर काँग्रेसने पुन्हा संयुक्त संसदीय समितीपुढे चौकशीची मागणी लावून धरली आहे. दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयानंतर आता राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी, यासाठी सत्ताधारी भाजप आंदोलन करणार आहे. 

भाजप करणार आंदोलन
भाजपच्या नेत्यांची आज, मुंबईत बैठक झाली. त्यात या आंदोलना संदर्भात चर्चा झाल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. चंद्रकांत पाटील म्हणाले, 'लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी राफेल विमानाचा मुद्दा उपस्थित केला होता. मुळात राहुल गांधी यांनी राफेलचा मुद्दा लोकसभेत आणि जागतिक पातळीवर उपस्थित करून, देशाची बदनामी केली आहे. आता कोर्टाच्या निर्णयानंतर त्यांनी देशाची माफी मागायला हवी.' राहुल यांनी माफी मागावी यासाठी भाजप देशभरात जिल्हा पातळीवर आंदोलन करणार आहे, अशी माहिती या वेळी चंद्रकांत पाटील यांनी दिली.

न्यायालयात काय घडले?
सुप्रिम कोर्टाने राफेलबाबत निर्णय दिला असून, सरकारला क्लीन चीट दिली आहे. सर्व पुनर्विचार याचिका कोर्टाने फेटाळून लावल्या आहेत. राहुल गांधी यांनी यापुढे न्यायालयाचा अवमान करणारी विधाने करू नयेत, असेही कोर्टाने खडसावले आहे. 

राहुल गांधी काय म्हणतात? 
सुप्रीम कोर्टाने क्लीन चीट दिल्यानंतरही राहुल गांधी आपल्या कामावर ठाम राहिले. लोकसभा निवडणुकीत 'चौकीदार चोर है', अशा शब्दांत काँग्रेसने विशेषतः राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केली होती. सरकार संयुक्त संसदीय समितीसमोर या प्रकरणाची चौकशी का करत नाही? असा मुद्दा राहुल यांनी उपस्थित केला होता. कोर्टाच्या निकालानंतरही या मागणीचा राहुल यांनी पुनरुच्चार केलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com