...ती जाहिरात मागे घेण्याची भाजपवर नामुष्की

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 19 फेब्रुवारी 2017

मुंबई: राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या प्रचारासाठी अवघे काही तास उरले असताना भाजपने मुंबई महापालिकेसाठी तयार केलेली, "मुंबई आणि भाजप मेड फोर इच अदर' ही जाहिरातच मागे घेण्याची नामुष्की भाजपवर ओढवली.

मुंबई: राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या प्रचारासाठी अवघे काही तास उरले असताना भाजपने मुंबई महापालिकेसाठी तयार केलेली, "मुंबई आणि भाजप मेड फोर इच अदर' ही जाहिरातच मागे घेण्याची नामुष्की भाजपवर ओढवली.

महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत इतर राजकीय पक्षांपेक्षा भाजपच्या प्रचाराच्या जाहिराती सोशल मीडिया आणि टीव्हीवर जास्त झळकताना दिसत आहेत. मात्र, त्या सर्व जाहिरांतीमध्ये कॉलेज तरुणांना घेऊन तयार केलेली "भाजप आणि मुंबई मेड फोर इच अदर' या जाहिरातीची जास्त चर्चा आहे. सुमार दर्जामुळे या जाहिरातीवर सोशल मीडियामध्ये टीकेचा भडीमार सुरू झाला. जाहिरातीत "मेड फॉर इच अदर' म्हणजेच तू आणि मी, अशी भावना तरुणाने व्यक्‍त केली असताना "चल, काहीही' अशा शब्दात तरुणी सुनावत असल्याची वाक्‍ये आहेत. याचा अर्थ तरुणी भाजपला "चल नीघ' असे म्हणत असल्याचे ध्वनीत होताना दिसते. जाहिरातीला नकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने अखेर मुख्यमंत्र्यांनी ही जाहिरात मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या सोशल मीडिया सेललाही खडसवल्याची माहिती सूत्रांनी दिली. या संदर्भात बोलताना भाजपचे प्रवक्‍ते माधव भंडारी यांनी अशा चुका चूकून होत असतात, अशी प्रतिक्रिया दिली.

Web Title: bjp return advertise in mumbai municipal