ठाण्यात तडजोड फसली 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

ठाणे - पालिकेच्या निवडणुकीत भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग झाल्याने रिपब्लिकनला अपेक्षेप्रमाणे जागा मिळाल्या नसल्याची सारवासारव उभय पक्षांकडून करण्यात आली होती. तसेच निवडून येण्याच्या निकषानुसार भाजपचे उमेदवार माघार घेतील, अशी तडजोड रिपब्लिकनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि भाजप शहर अध्यक्ष संदीप लेले यांच्यात झाली होती; मात्र ही तडजोड अखेर फसली. 10 जागांवर लढणाऱ्या रिपब्लिकनसमोरील भाजप उमेदवारांनी माघार घेण्यास स्पष्ट नकार दिल्याने ठाण्यात रिपब्लिकनला गाजर मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

ठाण्यात रिपब्लिकनशी युती असतानाही भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने त्यांना पालिका निवडणुकीत एकही जागा सोडली नाही. त्यामुळे रिपब्लिकनने 10 उमेदवार रिंगणात उतरवले. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी आठवले यांनी ठाण्यात येऊन भाजपशी जुळवून घेण्याचे संकेत दिले; तसेच भाजपची स्वबळावर सत्ता आल्यास मुंबई-ठाण्यात उपमहापौरपदाच्या आश्वासनाच्या गाजरावर समाधान मानले होते. त्याचबरोबर निवडून येणाऱ्या जागांबाबत तडजोड करून उर्वरित जागांवर भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला होता; मात्र भाजपने त्यांच्या मागणीला भीक न घालता उमेदवार मागे घेण्यास नकार दिला. रविवारी ठाण्यात मुख्यमंत्री येऊनसुद्धा रिपब्लिकनच्या पदरी निराशाच पडली. पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष रामभाऊ तायडे लढत असलेल्या प्रभाग 17 क मधील भाजपच्या उमेदवाराने माघार घेण्यास नकार दिला. रविवारी दिवसभर रिपब्लिकनचे अनेक नेते या प्रभागात दिलजमाईसाठी भाजप नेते संजय घाडीगावकर यांच्याशी संपर्क करत होते; मात्र शेवटपर्यंत तडजोड झाली नाही. 

भाजपचा डाव उघड 
ठाण्यात रिपब्लिकनला झुलवत ठेवून भाजपने आपल्या प्रादेशिक पक्ष संपवण्याच्या कूटनीतीची झलक दाखवली. पूर्वी ठाणे महापालिकेत रिपब्लिकनला शिवसेनेने सन्मानाने सत्तेत सहभागी करून घेतले होते; मात्र देशभर-राज्यभर युती करूनही पक्षाला एकटे पाडून मुख्यमंत्र्यांनी एकप्रकारे दगाफटका केल्याचा सूर रिपब्लिकन नेते खासगीत आळवत आहेत.

Web Title: bjp-rpi in thane