युतीच्या संसारात नोटाबंदीचा "बीब्बा'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

मुंबई ः केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना-भाजप युतीच्या संसारात नोटाबंदीच्या मुददयावरून "बीब्बा' पडला आहे. नोटाबंदी विरोधातील जनमताचा कानोसा घेत शिवसेना अधिक आक्रमक झाली आहे. या निर्णयामुळे काहीसा "बॅकफूट'वर आलेला भाजप सध्या शांत असला तरी योग्यवेळी याचे उटटे काढणार हे मात्र नक्‍की झाले आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेना-भाजपमधील दरी रुंदावात जाणार असून, याचे पर्यावसान सरकारमधून शिवसेना बाहेर पडण्यात तर होणार नाही ना, अशी चिंता या दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना लागली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ नोव्हेंबर रोजी पाचशे आणि हजार रुपयांचा नोटा चलनातून कायमच्या बाद केल्याची घोषणा केली. या घोषणेमुळे देशभरात आर्थिक गोंधळ सुरू झाला. तो अद्याप सुरू आहे. तो केव्हा थांबेल याची शाश्‍वती नाही. यामुळे देशभरातील जनतेला सध्या आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. याचा फटका आपणास आगामी निवडणुकीत बसू शकतो, असा अंदाज बांधत शिवसेनेने सावध भुमिका घेतली. सत्ताधारी पक्षासोबत आपण असल्यामुळे लोकांची आपल्यावर खप्पा मर्जी होईल, या भीतीने शिवसेनेने भाजप विरोधात टीकेची मोहिम सुरू केली आहे.

सध्या राज्यात निवडणुकीचा माहोल आहे. यामुळे नोटाबंदी निर्णयामुळे जनमत विरोधात जात असल्याचा अंदाज आल्यावर शिवसेनेने भाजपावरील आक्रमणाची धार अधिक तिव्र केल्याचे सांगितले जाते. भाजपला हे माहित नाही, असे नाही. मात्र सध्या "बॅकफूट'वर गेलेला भाजप सध्या शांत आहे. मात्र योग्यवेळी याचे उट्टे नक्‍की काढले जाईल, असे भाजपच्या गोटातून सांगण्यात येते. याचा परिणाम राज्यातील सरकारवर होणार असून परिणामी शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार तर नाही ना, अशी चर्चा दोन्ही पक्षांत सुरू आहे.

Web Title: bjp sena alliance has note ban issue