भाजप-शिवसेना युती होणारच : रावसाहेब दानवे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 डिसेंबर 2018

पालघर : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होणारच, असा विश्‍वास भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पालघरमध्ये नुकताच व्यक्त केला. भाजप-शिवसेना युती करून आगामी दोन्ही निवडणुका जिंकतील, असे ते यावेळी म्हणाले. 

पालघर : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होणारच, असा विश्‍वास भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पालघरमध्ये नुकताच व्यक्त केला. भाजप-शिवसेना युती करून आगामी दोन्ही निवडणुका जिंकतील, असे ते यावेळी म्हणाले. 

आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर रावसाहेब दानवे दोन दिवसांच्या पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे संघटनमंत्री विजयराव पुराणी, पालघरचे पालकमंत्री विष्णू सवरा, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार राजेंद्र गावित, आमदार संजय केळकर, आमदार पास्कल धानोरे आदी उपस्थित होते. यावेळी पालघरमधील भाजप नेत्यांची त्यांनी बैठक घेतली. पालघरमधील निवडणूक परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांशीही संवाद साधला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला आहे. पक्षसंघटनेत बुथ स्तरापासून कार्यकर्त्यांच्या नियुक्‍त्या झाल्या असून निवडणुका जाहीर होताच कार्यकर्त्यांची ही फळी वेगाने कामाला लागेल, असे ते म्हणाले. 

भाजप आणि शिवसेनेच्या युतीबाबत त्यांना विचारण्यात आले असता, ते म्हणाले, "आगामी लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्ही निवडणुकांमध्ये युती होईल. दोन्ही पक्ष युती करूनच या निवडणुका जिंकतील.' 

युतीबाबत पेच कायम 

पालघर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजप-सेना युती होईल किंवा नाही ही शंकाच आहे. लोकसभेची जागा ही भाजपसाठी आहे, तर शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी ही जागा आधीच श्रीनिवास वनगा यांच्यासाठी घोषित केली आहे. त्यामुळे या जागेसाठी पेच निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

युती झाली तर भाजपचे खासदार राजेंद्र गावित यांचे काय, हाही प्रश्‍न विचारण्यात येत आहे. येथील विधानसभेची जागा सेनेची असून या जागेवर भाजपचेही उमेदवार इच्छुक आहेत. त्यामुळे येथे युतीचा पेच कायम आहे.

Web Title: BJP Shiv Sena alliance will continue says Raosaheb Danwe