भाजपच्या महामेळाव्याचा उन्हाळी विशेष गाड्यांना फटका? 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

मुंबई -  2019 मध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर भाजपने मुंबईत शक्तिप्रदर्शनाची तयारी केली आहे. शुक्रवारी (ता.6) भाजपचा स्थापना दिन आहे. त्यामुळे वांद्रे कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानात भाजपचा महामेळावा होणार आहे. या सोहळ्याला देशाच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते हजेरी लावणार आहेत. कार्यकर्त्यांच्या प्रवासासाठी भाजपने सुमारे 28 विशेष गाड्यांचे आरक्षण केले आहे. त्याचा फटका मध्य व पश्‍चिम रेल्वे मार्गावरील उन्हाळी विशेष गाड्यांना बसणार आहे. 

पश्‍चिम मार्गावरील 11 आणि मध्य मार्गावरील 17 अशा एकूण 28 लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या फेऱ्या आयआरसीटीसीने रद्द करण्याचे योजले आहे. या सोहळ्याला महाराष्ट्रासोबत, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यांतून 28 विशेष गाड्या मुंबईला दाखल होतील. त्यामुळे बहुतांश गाड्यांच्या वेळेत बदल होण्याची शक्‍यता आहे. 

Web Title: BJP summer rally in special special trains