मुंबईतून देशमुख, नाशिकमधून अनिकेत पाटील

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 25 एप्रिल 2018

मुंबई - भारतीय जनता पक्षाने विधान परिषद निवडणुकीसाठी मुंबई शिक्षक मतदारसंघात अनिलकुमार राजेसिंह देशमुख व नाशिक शिक्षक मतदारसंघात अनिकेत विजय पाटील यांना पक्षातर्फे उमेदवार म्हणून घोषित केले आहे, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी मंगळवारी जाहीर केले. या उमेदवारांच्या विजयासाठी भाजपाचे कार्यकर्ते सर्वतोपरी प्रयत्न करतील, असे त्यांनी सांगितले.

या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन त्यांनी शिक्षक मतदारांना केले. अनिलकुमार राजेसिंह देशमुख हे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे अध्यक्ष आहेत. ते शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कायम अग्रेसर राहिले आहेत. मुंबईतील साठ्ये महाविद्यालयात गेली 27 वर्षे भौतिकशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून ते अध्यापन करीत आहेत. अनिकेत विजय पाटील हे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे प्रवक्ते आहेत, तसेच संजय एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आहेत.

Web Title: BJP teacher constituency vidhan parishad election politics