ठाण्यात भाजप शिवसेनेच्या विरोधात उभा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

ठाणे: भारतीय जनता पक्ष (भाजप) शिवसेनेच्या विरोधात उभी राहिली असून, महापालिका मुख्यालयातील पायऱयावर आज (मंगळवार) उपोषण करण्यात येत आहे.

घोडबंदर रोड येथील खेळाचे मैदान बांधकाम व्यावसायिकाला देणे, खाडीचे पाणी शुध्द करुन परत महापालिकेने विकत घेणे, गडकरी रंगायतनवर छत टाकणे, महाराष्ट्र बोर्डचे सुरक्षा रक्षकांची नेमणूक आदीं 450 कोटी रूपयांचे तब्बल 392 प्रस्ताव अवघ्या अर्धा तासात सत्ताधारी शिवसेनेने प्रशासनाशी हातमिळवणी करुन मंजूर केले. त्याचा निषेध करण्यासाठी भाजपाकडून थेट महापालिका मुख्यालयातील पायऱयावर उपोषण करण्यात येत आहे.

शनिवारी झालेल्या सर्वसभेत अनेक वादग्रस्त विषयांना केवळ अर्ध्या तासात मंजूरी देण्यात आली होती. 

Web Title: The BJP in Thane stood against Shiv Sena