'चौकीदार चोर है' वर भाजप करणार खुलासा

सुचिता करमरकर
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

कल्याण : सर्वोच्च न्यायालयाने राफेल खरेदी प्रकरणात भारतीय जनता पक्षाला क्लीनचिट दिली असली तरी काँग्रेस पक्षाचे आरोप कायम आहेत. विरोधकांनी जनतेच्या समोर देशाच्या पंतप्रधानांविरोधात 'चौकीदार चोर है' असे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला उत्तर म्हणून पक्ष देशभरात गाव आणि शहर पातळीवर जाऊन यावर खुलासा करणार आहे. याच मोहिमेचा एक भाग म्हणून पक्षाचे प्रवक्ते विश्वास पाठक यांनी आज कल्याणात पत्रकार परिषद घेतली.

कल्याण पश्चिमेचे आमदार नरेंद्र पवार या वेळी उपस्थित होते. राफेल व्यवहार नेमका काय आहे, यूपीए सरकारच्या काळात या व्यवहाराबाबत कशी दिरंगाई झाली, या व्यवहारात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचा सहभाग का नाही, रिलायन्स कंपनी या व्यवहारात काय भूमिका पार पाडणार यासंदर्भात पाठक यांनी माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकाल पत्राच्या आधारावर या व्यवहारातील विमानांच्या किमती, त्याबाबत विरोधक करत असलेले आरोप याबाबतही पाठक यांनी खुलासा केला विरोधकांनी जनतेसमोर पंतप्रधानांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले असेल तर भाजपही त्याचे उत्तर जनतेसमोर जाऊनच देणार आहे असे पाठक ठामपणे म्हणाले.

''कल्याण मेट्रो प्रकल्पाच्या उदघाटन कार्यक्रमावर शिवसेनेने टाकलेल्या बहिष्काराबाबत विचारलेल्या प्रश्नावर पाठक यांनी शिवसेना आमचा लहान भाऊ आहे, त्यांचा तो अधिकार आहे,'' असे सांगितले. मात्र पक्षाच्या अशा भूमिकेमुळे पक्ष लहान होत चालला आहे आणि आम्ही मोठे होत चाललो आहोत असा चिमटाही त्यांनी काढला.

Web Title: BJP will disclose What is the Rafael deal