महामेळाव्यातुन परतताना भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू 

नितीन बोंबाडे
शनिवार, 7 एप्रिल 2018

डहाणू - भाजपच्या वर्धानपनदिनानिमित्त मुंबई बीकेसी येथे महामेळावा झाला. या कार्यक्रमानंतर रात्री परतीच्या प्रवासाच भाजपच्या अनुसुचीत जाती, जमाती सेलचे तालुका अध्यक्ष नवनीत शामराव डेरे(५३) रा.नागपुर यांचे निधन झाले. शनीवारी पहाटे 3.00 च्या सुमारास डहाणू नजीक हद्यविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले.

मुंबईहुन शनीवारी रात्री 1.30च्या सुमारस मेळावा विशेष ट्रेन मुंबईहुन नागपुरला रवाना झाली. याट्रेनमध्ये  नवनीत डेरे आणि त्याचे सासरे सुनील शामराव बोरकर हे प्रवास करीत होते. नवनीत आपल्या कार्यकर्त्यांसह बाजुच्या बोगीत होते. प्रवासादरम्यान पहाटेच्या सुमारास नवनीत यांच्या मित्रांनी त्याचे सासरे सुनील बोरकर यांना अचानक त्यांची प्रकृती खालावल्याचे सांगीतले. त्यातच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. डहाणू रेल्वे स्थानकाजवळ ट्रेन थांबवुन त्यांना डहाणू उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, हा प्रकार समजताच 3.15 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डहाणुचे नगराध्यक्ष भरत राजपुत यांना ढेरे यांच्या कुटुंबियांना संपुर्ण मदत करण्यास सांगीतले. 
नागपुरचे आमदार डॉ.मिलिंद माने यांनी उपजिल्हा रुग्णालयात धावपळ केली. डहाणू येथे नवनीत यांचे शवविच्छेदन करण्यात आले. भरत राजपुत यांनी नवनीत डेरे यांचा मृतदेह डहाणू येथुन नागपुरला नेण्याची पुर्ण व्यवस्था केली. 

नवनीत डेरे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. 

Web Title: BJP worker's death on returning from the bjp's mahamelava