भाजप कार्यकारिणीची सांगलीत बैठक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

मुंबई - भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची आगामी बैठक सांगलीत घेतली जाणार आहे. भाजप कोअर समितीच्या सोमवारी रात्री झालेल्या बैठकीत कार्यकारिणीसाठी सांगलीची निवड करण्यात आली. मे महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात ही बैठक होईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक जूनमध्ये होऊ घातली आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिका निवडणुकीच्या मोर्चेबांधणीचा भाग म्हणून कार्यकारिणीसाठी सांगलीचे स्थान निश्‍चित करण्यात आले. कार्यकारिणीच्या बैठकीसाठी उस्मानाबाद, सातारा या दोन शहरांची चर्चा झाली; मात्र महापालिका निवडणूक होत असल्याने सांगलीत बैठक घेण्यावर एकमत झाले.

बैठकीसाठी अद्याप तारखा निश्‍चित करण्यात आल्या नाहीत; मात्र मे महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात कार्यकारिणीची बैठक होईल.

Web Title: BJP working committee meeting in sangli