भाजपचे मिशन 120, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची कसून तयारी

भाजपचे मिशन 120, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची कसून तयारी

मुंबई: महायुतीत आघाडी का स्वबळ यावरुन वाद सुरु असताना भाजपने महानगर पालिका निवडणुकीची तयारी सुरु आहे. यंदा मुंबईसाठी ‘मिशन 120’ तयार केले असून 120 नगरसेवक निवडूण आणण्याचे ध्येय ठेवले आहे. सध्या नगरसेवकांना प्रभागातील रखडलेल्या कामांवर जोर देण्याचे आदेश देण्यात आले असून प्रभागांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर मैदानावरची रणनिती सुरु होणार आहे.

2017 मध्ये शिवसेना आणि भाजप स्वबळावर पालिकेची निवडणुक लढले होते. तेव्हा शिवसेनेचे 97 आणि भाजपचे 83 नगरसेवक निवडून आले होते. भाजप त्यापुर्वी पर्यंत 227 पैकी 100 पर्यंत प्रभागात निवडणुक लढवत होती. मात्र,2017 मध्ये पहिल्यांदाच पुर्ण शक्तीने निवडणुक लढवून शिवसेनेच्या तोंडाला फेस आणला होता. मुलूंड, अंधेरी पश्‍चिम या भागातून सर्वच्या सर्व भाजपचे नगरसेवक निवडून आले. हा कौल पाहून उच्च वर्गिय मराठी मतदारांनीही भाजपला साथ दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

महापालिकेच्या कामकाजात शिवसेनेला घेरण्यास भाजपने सुरुवात केली आहे. त्यासाठी समित्याच्या बैठकांपुर्वी भाजपच्या नगरसेवकांच्या बैठका होऊ लागल्या आहेत. त्याचबरोबर प्रभागातील विकास कामांवर जोर देण्यात येणार आहे.

महानगर पालिकेची आगामी निवडणुक फेब्रुवारी 2022 ला होणार आहे. त्याच्या चार ते पाच महिन्यांपुर्वी प्रभागांचे आरक्षण जाहीर होईल. हे आरक्षण जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्ष मैदानातील रणनीती जोर धरणार आहे असे समजते. आरक्षण जाहीर होण्यास अवकाश असला तरी भाजपने 120 नगरसेवक निवडून आणण्याचा संकल्प केला आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली तसेच इतर नेत्यांच्या मार्गदर्शत काम सुरु असल्याचे प्रवक्ते, नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी सांगितले.

( संपादन - सुमित बागुल )

BJPs mission 120 for mumbai municipal corporation election BJP in action

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com