esakal | दिवा परिसरात पाण्यासाठी भाजपचा पालिकेवर मोर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

दिवा परिसरात पाण्यासाठी भाजपचा पालिकेवर मोर्चा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दिवा : दिवा शहरात गेल्या १० ते १५ वर्षांपासून पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. नागरिकांना वेळेवर पाणी मिळत नाही. विकत पाणी घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. त्यामुळे दिवा भाजप शिष्टमंडळाने महापालिकेवर हंडा-कळशी मोर्चा काढला होता; मात्र पाणी अभियंते आणि अधिकारीच जागेवर नसल्याने मोर्चातील महिलांनी जागेवर बसत ठिय्या आंदोलन केले.

हेही वाचा: गुजरात भाजप प्रदेशाध्यक्षांची लेक धरती देवरेंचा दणदणीत विजय

या आंदोलनात भाजप आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, भाजप पदाधिकारी आदेश भगत, नीलेश पाटील, रोहिदास मुंडे, अशोक पाटील, विनोद भगत, रोहन भगत, विजय भोईर, गणेश भगत, अजय सिंग, युवराज यादव, समीर चव्हाण, ठाणे नगरसेवक संजय वाघुले, जयदीप भोईर, श्रीधर पाटील, निखिल पाटील, समशेर यादव, संदेश भगत, अमरनाथ गुप्ता, सुप्रिया भगत, अर्चना पाटील, सीमा भगत, संगीता भोईर, रेश्मा पवार, शीला गुप्ता आणि हजारो महिला सहभागी झाल्या होत्या. दरम्यान टँकरचे पाणी विकत घेऊन आम्ही किती दिवस काढणार, आम्हाला न्याय मिळावा, असे मोर्चात सहभागी महिलांनी सांगितले.

loading image
go to top