काळ्या जादूच्या नावाखाली भोंदूबाबाकडून लैंगिक शोषण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

ठाणे - काळी जादू उतरविण्याच्या नावाखाली भोंदूबाबाने एका 35 वर्षीय महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार राबोडी येथे नुकताच उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी भोंदूबाबा आणि त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे. भोंदूबाबाची पत्नी रुबिना नूर मोहम्मद शेख (32) हिला पोलिसांनी अटक केली; मात्र भोंदूबाबा नूर मोहम्मद शेख (49) हा अद्याप फरार आहे.

दहिसरमधील एका 35 वर्षीय महिलेकडून काळी जादू उतरवण्यासाठी रुबिना आणि नूर शेख या दाम्पत्याने एक लाख 48 हजार रुपये घेतले. इतकेच नव्हे, तर उपचाराच्या नावाखाली नूर याने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंधही ठेवले. याचे चित्रण त्याची पत्नी रुबिना हिने काढत ते समाजमाध्यमांवर न पसरवण्यासाठी आणखी 50 हजार रुपयांची मागणी केल्याचे संबंधित महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: Black magic Sexual abuse Bhondubaba Crime