मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील गावात सुरू होता धक्कादायक प्रकार; टेम्पो पकडल्याने झाला उलगडा...

नाविद शेख | Saturday, 25 July 2020

रेशनिंग दुकानातील गव्हाचा काळा बाजार श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणला आहे. शनिवारी सकाळी 10 वाजता महामार्गालगतच्या गांजे गावातील रेशनिंग दुकानदार कृष्णा गोवारी यांच्या दुकानातून 60 पोती गहू पीकअप टेम्पोत भरून नेला जात असताना श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पकडला. पुरवठा विभागाकडून टेम्पोतील धान्याचा पंचनामा करण्यात आला आहे. याप्रकरणी मनोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. 

मनोर : रेशनिंग दुकानातील गव्हाचा काळा बाजार श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणला आहे. शनिवारी सकाळी 10 वाजता महामार्गालगतच्या गांजे गावातील रेशनिंग दुकानदार कृष्णा गोवारी यांच्या दुकानातून 60 पोती गहू पीकअप टेम्पोत भरून नेला जात असताना श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पकडला. पुरवठा विभागाकडून टेम्पोतील धान्याचा पंचनामा करण्यात आला आहे. याप्रकरणी मनोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. 

ही बातमी वाचली का? अवैध मटणविक्रीवर आता कारवाईचा बडगा; सोमवारपासून पालिकेची मोहीम....

मुंबई-अहमदाबाद महामार्गालगतच्या गांजे गावातील रेशनिंग दुकानदार कृष्णा गोवारी यांच्या दुकानातून धान्याचा काळाबाजार होत असल्याची माहिती श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. शनिवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास गांजे गावातून 60 पोती गहू भरून पीकअप टेम्पो महामार्गाच्या दिशेने निघाला होता. पाळतीवर असलेल्या श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गहू भरलेला टेम्पो ढेकाळे गावच्या हद्दीत अडवला. या वेळी श्रमजीवी संघटनेचे तालुका अध्यक्ष दिनेश पवार, सुरेश बरडे, किशोर सुकाड, नामदेव कांबडी, गंगाराम वांगड, देवराम भोईर, कान्हा पऱ्हाड आणि ग्रामस्थ उपस्थित होते. 

ही बातमी वाचली का? कोरोना गेला उडत! राजोडी समुद्रकिनाऱ्यावर तरुणाईच्या प्रेमाला बहर; पावसाळी वातावणाचा आनंद लुटण्यासाठी गर्दी

कडक कारवाईची मागणी 
श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी टेम्पोतील धान्याची खात्री करून, त्याबाबतची माहिती पुरवठा विभाग आणि मनोर पोलिसांना दिली. पुरवठा विभागाच्या पुरवठा निरीक्षकांकडून टेम्पोतील धान्याचा पंचनामा करून गांजे गावच्या रेशनिंग दुकानातील धान्याच्या साठ्याची खातरजमा करण्यात आली. धान्यासह टेम्पो जप्त करण्यात आला असून याप्रकरणी पुरवठा विभागाकडून मनोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, संबंधितांना कठोर शासन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
-------------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)