ओला-उबेरच्या 'बंद'मुळे काळी-पिवळीचा धंदा जोरात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 मार्च 2017

मुंबई - ओला-उबेर या मोबाईल ऍपवरील खासगी टॅक्‍सी कंपन्यांच्या विरोधात भागीदार चालकांनी शुक्रवारी "बंद' पुकारला. मनमानी पद्धतीने सुरू असलेली कंपन्यांची दंडवसुली व भाड्यातील दुजाभावामुळे चालकांनी पुकारलेल्या "बंद'मध्ये जवळपास अडीच हजार टॅक्‍सी सहभागी झाल्या होत्या. यामुळे काळी-पिवळी टॅक्‍सी व रिक्षाचालकांचा जवळपास 40 टक्के धंदा वाढला, असे टॅक्‍सी मेन्स युनियनचे सरचिटणीस ए. एल. क्वाड्रोस यांनी सांगितले.

कंपन्यांनी मागण्यांचा सकारात्मक विचार न केल्यास 21 मार्चला पुन्हा बेमुदत "बंद' पुकारण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे. ऑल ड्रायव्हर वेल्फेअर असोसिएशन, महाराष्ट्र टुरिस्ट परमिट युनियन व मुंबईकर विकास फाउंडेशनने एकत्रितपणे हा बंद पुकारला होता. कुर्ला परिसरातील उबेर आणि अंधेरीतील ओला कंपनीच्या कार्यालयांबाहेर चालकांनी टॅक्‍सी उभ्या करून घोषणाबाजी केली. 14 मार्चला आझाद मैदानात धरणे धरण्यात येणार आहे. या वेळी काही चालक उपोषणालाही बसतील. 21 मार्चपासून पुकारण्यात येणाऱ्या "बेमुदत बंद'मध्ये मुंबईतील चार हजारांहून अधिक चालक सहभागी होणार आहेत.

Web Title: black-yellow business increase