अंध व्यक्तींनी पाहिला सिनेमा

pune.jpg
pune.jpg

खारघर : अंध व्यक्तीने सिनेमा पाहिले हे ऐकताच तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील, परंतु ही गोष्ट खरी आहे. खारघर मधील रोटरी क्लब ऑफ नवी मुंबई सनराईजने नवी मुंबईतील 70 अंध मुले आणि अंध व्यक्तीला नुकताच वाशी मधील रघुलीलामॉल मधील सिनेमा घरात सिनेमा दाखविला आहे. या सिनेमाला व्हीस्परिंग सिनेमा असे म्हणतात. भारतात नवी मुंबईत हा उपक्रम राबविण्यात आले आहे.

पाश्चात्य देशात पडद्यावरील हुबेहूब वर्णन ध्वनिमुद्रित करून अंध व्यक्ती सोबत असलेला व्यक्ती हेडफोनद्वारे अंधांना सवांद ऐकविले जाते, जकार्ता (इंडोनेशिया ) येथे सी. सी. सुशीदत्त अशाच प्रकारे दोन वर्षांपूर्वी प्रयोग केला होता. देशात अनेक अंध व्यक्ती आहे. मात्र ते मनोरंजना पासून वंचित राहतात. नवी मुंबईतील काही अंध मुले आणि व्यक्तीना सिनेमा दाखवून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी रोटरी क्लब ऑफ नवी मुंबई सनराईज या सामाजिक संस्थेने वाशी येथील रघुलीला मॉल मधील सिनेमा घरात नवी मुंबईतील 70 मुले आणि व्यक्ती व त्यांचा सोबत एक स्वयंसेवक सर्वाना सिनेमा दाखविले.तसेच प्रथमच सिनेमा पाहिल्याने अंध मुले आणि व्यक्तीमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मराठी अभिनेत्री कल्पना भावसार, रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आशिष गांगुली यांच्यासह क्लबचे सदस्य उपस्थित होते.

 प्रयोगाच्या वेळी नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंड ,इटीसी सेंटर आणि आय नॉक्स  व इतर संस्था चा सहभाग लाभला.विशेष म्हणजे अंधांना सिनेमा खूप आवडल्याचे पाहून समाधान वाटत आहे.-प्रकाश ,अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ नवी मुंबई सनराईज.

अंध व्यक्तीला सिनेमा  दाखविण्याचा उपक्रम पहिल्यानंदाच पहिला,  रोटरी क्लबने राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक मराठी अभिनेत्री कल्पना भावसार यांनी केले.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com