रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर ब्लॉक 

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर ब्लॉक 

मुंबई - मध्य रेल्वे उपनगरी रेल्वे मार्गाच्या कामासाठी आणि हार्बर रेल्वे मार्गावरील दुरुस्तीसाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. काही रेल्वे मार्गावरील सेवा वळविण्यात आली आहे. 

मध्य रेल्वे 
कुठे - मुलुंड ते माटुंगादरम्यान जलद मार्गावर 
कधी - सकाळी 11.15 ते दुपारी 3.15 
परिणाम - सकाळी 10.37 ते दुपारी 2.48 पर्यंत कल्याण येथून सुटणाऱ्या सीएसएमटीकडे धावणाऱ्या सर्व जलद मार्गावरील सेवा दिवा आणि परळ स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावरून चालवण्यात येणार आहेत. परळ स्थानकानंतर लोकल जलद मार्गावर चालवण्यात येतील. सकाळी 10.50 ते दुपारी 2.54 वाजेपर्यंत सीएसएमटी येथून सुटणाऱ्या जलद, सेमी जलद मार्गावरील गाड्या घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकावर थांबविण्यात येणार आहेत. गाड्या 20 मिनिटे उशिराने धावणार आहेत. सर्व मेल, एक्‍स्प्रेस गाड्या नियोजित स्थानकावर 20 मिनिटे उशिराने पोहचतील. रत्नागिरी-दादर पॅसेंजरला दिवा स्थानकावरच थांबविण्यात येणार आहे. तर याच पॅसेंजरला दादरऐवजी दिवा स्थानकावरून सोडण्यात येणार आहे. या पॅसेंजरने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दादर स्थानकावरून विशेष लोकल सेवा चालवण्यात येणार आहे. 

हार्बर रेल्वे 
कुठे - कुर्ला - वाशी या हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर 
कधी - सकाळी 11.10 ते दुपारी 3.10 

परिणाम - सकाळी 10.34 ते दुपारी 2.34 वाजेपर्यंत सीएसएमटी ते पनवेलदरम्यान लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे. तर सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल दरम्यान विशेष सेवा चालवण्यात येणार आहे. हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत मुख्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावरून प्रवास करता येणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com