माहिममध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन

दिनेश चिलप मराठे
बुधवार, 13 जून 2018

मुंबई : माहिम येथील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या विभागीय मुख्यालयात दलाच्या 50 व्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिरात वरिष्ठ कमांडेंट शिप्रा श्रीवास्तव यांनी 100 पेक्षा जास्त जवानांसह रक्तदान करत प्रत्येक सुदृढ़ युवकाने वर्षातून कमीत कमी 3 वेळा रक्तदान करावे असे आवाहन केले. 

मुंबई : माहिम येथील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या विभागीय मुख्यालयात दलाच्या 50 व्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिरात वरिष्ठ कमांडेंट शिप्रा श्रीवास्तव यांनी 100 पेक्षा जास्त जवानांसह रक्तदान करत प्रत्येक सुदृढ़ युवकाने वर्षातून कमीत कमी 3 वेळा रक्तदान करावे असे आवाहन केले. 

या वेळी उपस्थित जवान आणि अधिकारी वर्गास मार्ग दर्शन करताना शिप्रा श्रीवास्तव म्हणाल्या, 10 मार्च 1969 मध्ये भारताच्या औद्योगिक संसाधनांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाची स्थापना करण्यात आली होती. आज आम्ही उपमहानिरीक्षक सतीश खंडारे आणि संजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई, नवी मुंबईत सुरक्षा देत आहोत. देशातील सर्व राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विमानतळे, ओएनजीसी, माझगाव डॉक, आरसीएफ सारख्या अत्यंत महत्वाच्या संसाधनांच्या सुरक्षेची 

जबाबदारी प्राणपणाने करत आहोत. आम्हाला राष्ट्र सुरक्षेच्या क्षेत्रात कर्तव्य बजावताना वेळ प्रसंगी देशासाठी सर्वोच्च बलिदानाची इच्छा असते. आमच्या जवानांची शारीरिक तंदुरुस्ती, शौर्य चेहऱ्यावरील ऊर्जा पाहिल्यास सर्वच लोक अचंभित होतात. देश रक्षणा बरोबरच नागरिकांच्या जीवन रक्षणासाठी आम्ही कें.औ.सुरक्षा दलाच्या 50 व्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त रक्तदान शिबिर तसेच पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण कार्यक्रमांचे आयोजन करीत आहोत. त्याच बरोबर आपातकालीन बचाव कार्यास सदैव तयार आहोत. 

तसेच नुकताच दहावी बारावी विद्यार्थ्यांचा निकाल लागला. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे देखील त्यांनी अभिनंदन केले. या युवकांनी व युवतीनी देश सेवेकरिता आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, सीआयएसएफ, सीआरपीएफ या सुरक्षा सेवेत करियर करण्याचा संकल्प करावा. कठिण परिश्रम घेत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करावा. कसुन व्यायाम आणि मैदानी खेळ खेळावेत. यश नक्कीच मिळेल. मनावरील ताणतणाव दूर करण्यासाठी संवाद हा उत्तम पर्याय आहे. घरात कुटुंबाशी आणि बाहेर मित्रांशी संवाद साधत मन मोकळेपणाने समस्यावर चर्चा करा.जास्त त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्लाघ्या असे मार्गदर्शन केले.

रक्तदान शिबिरास एस.एल.रहेजा हॉस्पिटल(माहिम) आणि फोर्टीज हॉस्पिटल(मुलुंड) यांच्या वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Web Title: Blood Donation Camp at Mahim