रक्तदाब आणि मधुमेहाने मुंबईला पोखरले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

मुंबई - बदललेल्या जीवनशैलीमुळे मुंबईकरांना वेगवेगळ्या आजारांनी ग्रासले असल्याची माहिती चिंतेचा विषय ठरली आहे. वन रुपी क्‍लिनिकमध्ये वर्षभरात उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचे तब्बल ४० टक्के रुग्ण दाखल झाल्याची माहिती संस्थापक डॉ. राहुल घुले यांनी दिली.

केवळ एका रुपयात रुग्णसेवा देणाऱ्या वन रुपी क्‍लिनिकची आज वर्षपूर्ती. मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या रेल्वे स्थानकांजवळ वर्षभरात १२ ठिकाणी क्‍लिनिक उभे राहिले. त्यामुळे कामानिमित्ताने रेल्वेच्या स्थानकांवर सहज उपलब्ध झालेल्या क्लिनिकमध्ये मुंबईकरांनी खिशाला सहज परवडणाऱ्या एका रुपयात उपचार करून घेण्यास प्राधान्य दिले. क्‍लिनिकमध्ये वर्षभरात तब्बल ५० हजार रुग्णांनी उपचार घेतले. त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण उच्च रक्तदाब व मधुमेहाचे होते. मुंबईकरांमध्ये मधुमेह-२ प्रामुख्याने आढळून येत आहे. दोन्ही आजार जीवनशैलीशी संबंधित आहेत. पुरेशी झोप न घेणे, वेळेवर न खाणे आदी चुकीच्या जीवनशैलीमुळे असे आजार बळावतात, असे डॉ. राहुल घुले म्हणाले.

इथे आहेत क्‍लिनिक
 मध्य रेल्वे : कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, दादर, भायखळा, मुंब्रा आणि टिटवाळा
 हार्बर रेल्वे : वडाळा, वाशी, गोवंडी आणि मानखुर्द
रुग्णसेवेची थोडक्‍यात माहिती
 १२०० रुग्णांनी गोल्डन अवरमध्ये रुग्णसेवा घेतली
 ४ महिलांची प्रसूती
 १५ ते २० रुग्ण हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने आले होते. त्यांच्यावरही उपचार केले

Web Title: Blood pressure and diabetes collapsed in Mumbai