कावळ्यांना कावकाव  करू द्या, पालिकेवर पुन्हा भगवाच - उद्धव 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

मुंबई - हल्ली मुंबईत खूप कावळ्यांची कावकाव सुरू आहे. ते मुंबईच्या कारभारावरही टीका करीत आहेत. असे असले तरी मुंबई महापालिकेवर पुन्हा भगवा फडकणारच, असा विश्‍वास शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (ता. 2) येथे व्यक्त केला. 

शिवसेनेच्याच महापौराला पुन्हा विराजमान करण्यासाठी मार्चमध्ये पालिका मुख्यालयात येईन, असा विश्‍वासही ठाकरे यांनी व्यक्त केला. पालिकेच्या सभागृहात लावलेल्या प्रबोधनकार ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले, परंतु मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात युतीबाबत वा उद्धव यांच्या विधानावर कोणतेही भाष्य करणे टाळले. 

मुख्यमंत्री आणि ठाकरे युतीबाबत काही बोलतील अशी अटकळ बांधली जात होती, परंतु या दोन्हीही नेत्यांनी त्याबाबत विधान करणे टाळले. मुंबई पालिकेत शिवसेना-भाजप खांद्याला खांदा लावून काम करीत आहे, त्यामुळेच मुंबईचा विकास झाला, असा दावा करीत पालिकेवर पुन्हा भगवा फडकेल असा विश्‍वास ठाकरे यांनी व्यक्त करण्याबरोबरच शिवसेनाच पालिकेतील मोठा भाऊ असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 
 
युतीतली "उभी' फूट 
प्रबोधनकार ठाकरेंच्या तैलचित्राचे अनावरण सोमवारी मुंबई महापालिकेत करण्यात आले. नेहमीच आपली भूमिका ठामपणे मांडणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या वेळी संभ्रमात असल्यासारखे एकीकडे पाहत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आवेशात दुसरीकडेच बोट दाखवून आवेशाने काहीतरी बोलताना दिसले. युतीतली ही "उभी' फूट पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. 

Web Title: BMC again shivsena - Uddhav