भाजपमध्येच यादीची पळवापळव 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी धुमधडाक्‍यात जाहीर करून आश्‍चर्याचे धक्‍के देण्याच्या भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या स्वप्नांना त्यांच्याच कार्यकारिणीचे सचिव विवेकानंद गुप्ता यांनी सुरुंग लावला. 

शेलार यांच्यासमोरून उमेदवारांची पहिली यादी गुप्ता यांनी गायब करीत सोशल मीडियावरून ती प्रसिद्ध केल्याने शेलार देखील आवाक झाले होते. निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्याचा खरा मान आशिष शेलार यांचाच; पण शेवटपर्यंत याची गुप्तता राखण्याच्या प्रयत्नात ती यादी अखेरीस "लीक' झाली. बुधवारी (ता. 1) रात्रीच उमेदवारांची यादी माध्यम प्रतिनिधी आणि भाजप कार्यकर्त्यांच्या व्हॉट्‌सऍपवर व्हायरल झाली होती. पक्षाचे नीतिनियम, गोपनीयतेचे धडे देणाऱ्या भाजपमध्येच या सर्व गोष्टींना हरताळ फासून यादी अनधिकृतरीत्या प्रसिद्ध केली. 

उमेदवार निवडीच्या शेवटच्या टप्प्यात हे घडल्याने अखेरीस शेलार यांनाच यावर पांघरूण घालण्याची वेळ आली. याविषयी पत्रकार परिषदेत त्यांना विचारले असता, हा "डिजिटल इंडिया'चा परिणाम असल्याची सारवासारव त्यांनी केली. मात्र, या प्रकरणाची पक्षाने गंभीर दखल घेतल्याचा इशाराही शेलार यांनी दिला. 

Web Title: BMC bjp list