BMC Budget 2023 : मुंबईकरांच्या आरोग्याची BMC ला काळजी; अर्थसंकल्पात केली मोठी घोषणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BMC Budget 2023

BMC Budget 2023 : मुंबईकरांच्या आरोग्याची BMC ला काळजी; अर्थसंकल्पात केली मोठी घोषणा

BMC Budget 2023 : देशाच्या अर्थसंकल्पापाठोपाठ आता आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेचा 2023-24 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे.

हेही वाचा : रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी

आयुक्त आणि प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी विक्रमी 52 हजार कोटीचं बजेट सादर केलं. यंदा पहिल्यांदाच BMC ने 50 हजार कोटींचा आकडा पार केला असून, सादर करण्यात आलेले BMC चं बजेट 52 हजार 619 कोटींचे आहे.

सादर करण्यात आलेल्या या अर्थसंकल्पात मुंबईसाठी आणि मुंबईकरांसाठी मोठ्या घोषणा करण्याबरोबरच अनेक भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही. याशिवाय यंदाच्या अर्थसंकल्पात वाढतं प्रदूषण रोखण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.

मुंबईतील वाढत प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी पहिल्यांदाच अर्थसंकल्पात दीड हजार कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे. शहरातील वायु प्रदुषण कमी करण्यासाठी वायु प्रदूषण नियंत्रण कृती योजना अस्तित्वात आणण्यात आली आहे.

  • बीएमसीने दहिसर टोल नाका, मुलुंड चेक नाका, मानखुर्द, कलानगर जंक्शन आणि हाजी अली जंक्शन या सर्वाधिक गर्दीच्या पाच ठिकाणी हवा शुद्धीकरण यंत्र बसवण्याचे योजले आहे

  • नजिकच्या काळात 'नेट झिरो' ची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वातावरण कृती आराखडा कक्ष (क्लायमेट ॲक्शन प्लॅन स्थापन )करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

  • कार्बनचा समतोल राखण्यासाठी विशेष पावलं उचलली जाणार

  • यामध्ये शहरी वनीकरण उपक्रम हाती घेतला जाणार

  • राज्य शासनाच्या अभियानांतर्गत 35 इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी करण्याची प्रस्ताविले आहे.

  • महानगरपालिकेच्या सार्वजनिक वाहन तळामध्ये वाहन चार्जिंग प्रणाली उभारण्याकरिता बीएमसी सज्ज आहे.