
महानगर पालिकेच्या 50 बड्या थकबाकी दारांनी तब्बल दिड हजार कोटी रुपये थकवले आहेत.यात सर्वाधिक थकबाकी ही फॉर्च्युन बिल्डर 164 कोटी रुपयांची आहे
मुंबई : मुंबई महानगर पालिकेचा तब्बल 15 हजार कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकित आहे.यात बिल्डर, उद्योजकांची संख्या मोठी आहे.अशा महत्वाच्या पहिल्या 50 थकबाकी दारांवर जप्तीची कारवाई करण्याचा निर्णय आज स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी मालमत्ता कराच्या थकबाकीचा मुद्दा उपस्थित करुन याकडे लक्ष वेधले. कोविड मुळे पालिकेची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. अशा परिस्थितीत थकबाकी वसुल करण्यासाठी कठोर पावले उचलणे गरजेचे आहे.तब्बल 15 हजार कोटी रुपयांची थकबाकी असून या थकाबकीदारांची मालमत्ता जप्त करण्यात यावी.अशी सूचना रवी राजा यांनी मांडली.त्याला सर्व पक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिला. महानगर पालिकेची आर्थिक परिस्थिती हालखीची असतानाही जाहिरातदार, हॉटेल्स यांना सुट दिली जात आहे.असा मुद्दा भाजपचे भालचंद्र शिरसाट यांनी उपस्थित केला.
900 कोटींची वसुली
या आर्थिक वर्षात पालिकेने 6700 कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसुल करण्याचे ध्येय ठेवले होते.मात्र,काही महिन्यांपुर्वी 4 हजार 500 ते 5 हजार
कोटी रुपयांपर्यंत मालमत्ता कर वसुल करण्याचा निर्णय घेण्यात आहे.मात्र, अद्याप पर्यंत 900 कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसुल झाला आहे. उर्वरीत कर कसा वसुल केला जाणार असा प्रश्नही रवी राजा यांनी उपस्थीत केला.
मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा
50 जणांनी दिड हजार कोटी थकवले
महानगर पालिकेच्या 50 बड्या थकबाकी दारांनी तब्बल दिड हजार कोटी रुपये थकवले आहेत.यात सर्वाधिक थकबाकी ही फॉर्च्युन बिल्डर 164 कोटी रुपयांची आहे.महानगर पालिका थकबाकी दारांना दंडात सुट देते त्यानंतरही जर वसुली होत नसेल तर सक्त कारवाई झाली पाहिजे.असेही यावेळी नमुद करण्यात आले.
BMC on builders The decision of the standing committee will be to confiscate the property
--------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )