मुंबईच्या प्रत्येक प्रभागात मधुमेह क्लिनिक; आहार तज्ज्ञांचाही सल्ला मिळणार | Mumbai Health update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Diabetes clinic

मुंबईच्या प्रत्येक प्रभागात मधुमेह क्लिनिक; आहार तज्ज्ञांचाही सल्ला मिळणार

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : महापालिकेने २४ प्रशासकीय प्रभागांतील (BMC) प्रत्येक दवाखान्यात (every hospital) मधुमेह क्लिनिक (Diabetes clinic) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या क्लिनिकमध्ये आठवड्यातील काही दिवस आहार तज्ज्ञही (food exoerts) हजर राहाणार आहेत. माझे कुटुंब माझे अभियाना अंतर्गत झालेल्या सर्वेक्षणात मुंबईतील नागरिकांच्या आरोग्याची कुंडली (health report) महापालिकेकडे उपलब्ध झाली आहे. यात वयोमानानुसार प्रत्येक नागरिकांच्या दीर्घकालीन व्याधींची माहिती महापालिकेकडे आहे. यात मधुमेह रुग्णांची (Diabetes patient information) माहिती प्रत्येक प्रभागातील वॉर रूमला दिली जाणार आहे. या वॉर रूममधून रुग्णांशी संपर्क साधून त्यांच्या औषध उपचारांबाबत (Medicine treatment) माहिती घेतली जाणार आहे. ज्यांचे उपचार थांबले आहेत त्यांच्यावर पालिकेमार्फत उपचार सुरू करण्यात येतील, असे सांगितले.

हेही वाचा: राज्य नाट्य स्पर्धा डिसेंबरपासून सुरू होणार; अमित देशमुख यांची घोषणा

मधुमेह हा पूर्वी श्रीमंतांचा आजार मानला जात होता. मात्र, आता या आजाराचे स्वरूप बदलत असल्याने जीवनशैलीशी निगडित आजार झाला आहे. आहारातील बदललेल्या शैलीमुळे वस्त्यांमध्येही मधुमेहाचे रुग्ण आढळू लागले आहेत; तर बालकांमध्येही आजार आढळू लागला आहे. कोविडचा रुग्ण आल्यावर त्याला मधुमेह, उच्च रक्तदाब नसला तरी अर्धी लढाई जिंकल्यासारखे असायचे. पुढील काही दिवसांत पालिका मधुमेह क्लिनिक सुरू करणार आहे. मधुमेहाच्या वैद्यकीय उपचारांबरोबरच आहारही महत्त्‍वाचा असतो.

महापालिकेच्या २४ प्रशाकीय प्रभागांतील किमान एका दवाखान्यात मधुमेह क्लिनिक सुरू करण्यात येणार आहे. तसेच, ठराविक दिवसात या क्लिनिकमध्ये आहारतज्ज्ञही उपस्थित राहातील. ज्या रुग्णांना औषध उपचाराने मधुमेह नियंत्रित ठेवता येऊ शकतो त्यांना औषधे दिली जातील. ज्यांच्यावर उपचारांची आवश्‍यकता आहे त्यांना रुग्णालयात पाठवले जाईल, असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

loading image
go to top