मुंबई महापालिका निवडणूक "राष्ट्रवादी'ची यादी जाहीर 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजण्याची वेळ जवळ येत असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसने थेट उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत बाजी मारली आहे. मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत 45 उमेदवारांची यादी जाहीर केली. यामुळे कॉंग्रेस सोबतच्या आघाडीचे सर्व पर्याय आता मोडीत निघाले असून, "राष्ट्रवादी'ने स्वबळावरच निवडणुका लढणार असल्याचे जाहीर केले. 

आगामी महापालिका निवडणुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष ताकदीने लढणार असल्याचे अहिर यांनी सांगितले. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन तसेच संघटन व त्यांच्या कामाचे मूल्यमापन करून ही यादी तयार करण्यात आली आहे. काल पुण्यात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, मुंबई प्रभारी जयंत पाटील या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीतही याबाबत चर्चादेखील करण्यात आली होती. त्यानुसार आज पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आल्याचे अहिर यांनी स्पष्ट केले. 

यादीमध्ये 15 मुस्लिम उमेदवारांना संधी दिली आहे. बहुतांश डॉक्‍टर, वकील यांच्यासह युवा कार्यकर्त्यांचा समावेश आहे. 

Web Title: bmc election ncp list declared