Mumbai : मुंबईतील भटक्या कुत्र्यांची जूनपासून होणार गणना; मुंबईकरांना होणाऱ्या त्रासाची दखल

भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असून कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याने पालिकेने येत्या जूनपासून भटक्या कुत्र्यांची गणना करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला
bmc has decided to enumerate stray dogs animal protection mumbai
bmc has decided to enumerate stray dogs animal protection mumbai sakal
Summary

भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असून कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याने पालिकेने येत्या जूनपासून भटक्या कुत्र्यांची गणना करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला

मुंबई - भटक्या कुत्र्यांचा टुविलरचा जीवघेणा पाठलाग, एकट्या दुकट्या व्यक्तीवर होणारे हल्ले हे चित्र मुंबईतील शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी दिसते. भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असून कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याने पालिकेने येत्या जूनपासून भटक्या कुत्र्यांची गणना करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या कामासाठी मान्यता प्राप्त संस्थेची निवड करण्यात आली आहे.

गेल्या मुंबईत २०१४ मध्ये भटक्या कुत्र्यांची गणना झाली होती. आता भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे देशांत काम करणाऱ्या ह्युमन सोसायटी इंटर नॅशनल संस्थेच्या माध्यमातून पुन्हा एकदा जूनपासून भटक्या कुत्र्यांची गणना होणार आहे. या संस्थेने जूनपासून पुढील तीन ते चार महिन्यांत भटक्या कुत्र्यांची गणना करुन अहवाल सादर करणे अपेक्षित असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

भटक्या कुत्र्यांचा मुंबईकरांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. गेल्या पाच वर्षांत भटक्या कुत्र्यांनी साडेतीन लाख मुंबईकरांना चावा घेतल्याने ते जखमी झाले. सन २०१४ मध्ये मुंबई महापालिकेने ह्युमन सोसायटी ऑफ इंटरनॅशनल संस्थेच्या माध्यमातून श्वानांची गणना केली असता मुंबईत २ लाख ९६ हजार २२१ भटके कुत्रे आढळले होते. मात्र सद्या मुंबईत भटक्या कुत्र्यांची संख्या नेमकी किती याचा शोध घेण्यासाठी ह्युमन सोसायटी इंटर नॅशनल संस्थेच्या माध्यमातून भटक्या कुत्र्यांची गणना होणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

भटक्या कुत्र्यांच्या चाव्याने जखमी

२०१८ - ८५,४३८

२०१९ - ७४,२७९

२०२० - ५३,०१५

२०२१ - ६१, ३३२

ऑगस्ट २०२२ पर्यंत - ५०, ६२२

एकूण ३,२४,६८६ जण जखमी

भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण

२०१८ - २१,८८६

२०१९ - १८,९१२

२०२० - १४,४०८

२०२१ - १७,५३४

ऑगस्ट २०२२ पर्यंत - ७,७७३

एकूण निर्बीजीकरण - ८०,५१३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com