महापालिकेच्या रुग्णालय कर्मचाऱ्यांनी टाकला 'या' गोष्टीवर बहिष्कार; आंदोलन करण्याचा दिला इशारा.. 

biometric attendance
biometric attendance

मुंबई: महापालिकेच्या रुग्णालय कर्मचाऱ्यांनी आज बायोमेट्रीक हजेरीवर बहिष्कार टाकला. महापालिका प्रशासनाला 5 दिवसांनी मुदत दिली असून त्यानंतर आंदोलन छेडण्याचा इशारा कामगार संघटनांनी दिला आहे.

कोविडच्या साथीमुळे केंद्र सरकार राज्य सरकार आणि त्यानंतर महापालिकेने कर्मचार्यांसाठी बायोमेट्रीक हजेरी स्थगित केली होती. मात्र,महापालिकेने आज पासून बायोमेट्रीक हजेरी सुरु केली आहे.

या निर्णयाला सर्व कामगार संघटनांनी विरोध केला होता. मात्र, आज पासून ही हजेरी सुरु झाली आहे. पालिकेच्या सर्व  रुग्णालयातील कर्मचार्यांनी आज बयोमेट्रीक हजेरी नोंदवलेली नाही. तसेच पुढील 5 दिवस हजेरी नोंदवणार नसून त्यानंतरही प्रशासनाने निर्णय न बदलल्यास आंदोलन छेडू असा इशारा म्युनिसीपल मजदूर युनियनेने दिला आहे.

रुग्णालयातील प्रत्येक कर्मचारी जिव धोक्यात  घालून काम करत आहे. बायोमेट्रीक हजेरी मुळे कोविड संसर्गाचा धोका अधिक वाढणार आहे. राज्य सरकानेही अद्याप बायोमेट्रीक हजेरी सुरु केलेली नाही.

मग पालिकेचा हट्ट का असा प्रश्न युनियनचे प्रतिनीधी प्रदिप नारकर यांनी उपस्थीत केला. बायोमेट्रीक हजेरी नोंदवल्यानंतरही लिखीत हजेरी नोंदविण्यात येते. मग प्रशासन हा हट्ट का करत आहे असा प्रश्नही त्यांंनी उपस्थीत केला. 

bmc hospital employees denied to gove biometric attendance 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com