कंगनाच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेचा हातोडा, काही तासात अभिनेत्री मुंबईत

पूजा विचारे
Wednesday, 9 September 2020

अभिनेत्रीच्या कार्यालयातील १२ अनधिकृत बांधकामावर कारवाई केली जाईल. कंगनाच्या पाली हिलमधील कार्यालयाबाहेर मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आलाय.  महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी दाखल झालेत.

मुंबईः अभिनेत्री कंगना राणावत कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर कारवाईला सुरुवात झाली आहे. मुंबई  महापालिकेनं कंगनाच्या कार्यालयाच्या तळमजल्यावर कारवाई सुरु केलीय. अभिनेत्रीच्या कार्यालयातील १२ अनधिकृत बांधकामावर कारवाई केली जाईल. कंगनाच्या पाली हिलमधील कार्यालयाबाहेर मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आलाय.  महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी दाखल झालेत. कंगनाच्या कार्यालयाबाहेर जेसीबी आणि बुलडोझरच्या साहाय्यानंही कारवाई करण्यात येतेय. 

२०१७ मध्ये कंगनानं हा बंगला विकत घेतला होता. या बंगल्याच्या दुरुस्तीच्या नावावर बेकायदा अंतर्गत बदल करण्यात आले होते. हा बंगला निवासी असून त्यात बेकायदा व्यावसायिक वापर सुरु होता. दरम्यान या तोडकामाचा खर्चही  कंगनाकडून वसुल करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.  हातोडा, फावडा, कुदळ घेऊन आलेले ५० पेक्षा जास्त कर्मचारी कारवाई करताना दिसत आहे. महापालिका दोन कॅमेऱ्यातून या कारवाईचं चित्रीकरण देखील करत आहे. 

कंगनाचे वकिल यांनी मुंबई उच्च न्यायालयात मुंबई पालिकेनं केलेल्या कारवाई विरोधात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर १२.३० सुनावणी होणार आहे. कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी मुंबई उच्च न्यायालयात तातडीने याचिका दाखल केली आहे.  मुंबई महापालिकेच्या तोडक कारवाईला स्थगिती देण्याची मागणी याचिकेत केली. वकिलांनी कारवाईच्या ठिकाणी दाखल झालेत. कारवाई थांबवण्याची त्यांनी मागणी केली आहे.

 

दुसरीकडे मुंबईच्या दिशेनं रवाना झालेल्या कंगनानं या तोडफोडीचे फोटो ट्विट केले आहेत. या ट्विटमध्ये तिनं पाकिस्तान असं लिहून #deathofdemocracy हा हॅशटॅगही वापरला आहे. तसंच कारवाई करण्याआधी आणखी एक ट्विट तिनं केलं आहे. त्या ट्विटमध्ये तिनं म्हटलं की, महाराष्ट्र सरकार आणि त्यांचे गुंड माझ्या ऑफिसजवळ जमा झाले आहेत आणि ते बेकायदेशीरपणे तोडण्यासाठी तयार झाले आहेत, जे करायचं ते करा. 

 

मुंबई पालिकेनं मंगळवारी नोटीस देखील बजावली होती. नोटीशीला २४ तास उलटल्यानंतर पालिकेकडून तोडक कारवाईस सुरुवात झाली आहे.

BMC officials demolition Kangana Ranaut office lawyer files a plea in High Court against the demolition


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BMC officials demolition Kangana Ranaut office lawyer files a plea in High Court against the demolition