ड्राय रन यशस्वी झाल्यास उद्यापासून फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना मिळणार लसीकरण

ड्राय रन यशस्वी झाल्यास उद्यापासून फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना मिळणार लसीकरण

मुंबई: महानगर पालिकेने आज फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी ड्राय रन आयोजित केला आहे. हा ड्राय रन यशस्वी झाला तर फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांसाठी उद्यापासून लसीकरण राबवले जाईल. म्हणजे, आता आरोग्य कर्मचाऱ्यानंतर फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण केले जाईल. राज्य सरकारने सर्व जिल्ह्यांना आरोग्य सेवा कर्मचार्‍यांसह फ्रंटलाईन वर्कर्सचे ही लसीकरण सुरू करण्याचे निर्देश दिल्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आला आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी फ्रंटलाईन  वर्कर्सला लसीकरणापूर्वी सर्व तयारी सुरू केली असून आज एका केद्रांवर ड्राय रन घेतला जात आहे. दरम्यान, हा ड्राय रन यशस्वी झाला तरच फ्रंटलाईन वर्कर्सला उद्यापासून लसीकरणात समाविष्ट केले जाईल.

आजपर्यंत जवळपास 5.80 लाख आघाडीच्या कामगारांनी लसीकरणासाठी को-विन अ‍ॅपवर नोंदणी केली असून त्यापैकी 1.70 लाख फ्रंटलाईन वर्कर्स मुंबईतील आहेत. फ्रंटलाईन वर्कर्समध्ये नगरपालिका कर्मचारी, पोलिस, संरक्षण, सुरक्षा रक्षक, घनकचरा व्यवस्थापन कर्मचारी, महसूल विभाग कर्मचारी आणि बेस्ट चालक व कंडक्टर यांचा समावेश आहे.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात दिवसाला दहा हजार लोकांना लसीकरण करण्याचे लक्ष्य योजिले आहे. दरम्यान, आज फक्त एकाच केद्रांत फ्रंटलाईन वर्कर्स साठीचा ड्राय रन घेतला जात आहे.  हा ड्राय रन यशस्वी झाला तर उद्यापासून फ्रंटलाईन वर्कर्स आणि हेल्थकेअर वर्कस यांना सोबत लसीकरण दिले जाईल. फ्रंटलाईन वर्कर्स साठी कोविन अॅप अॅक्टिव्ह झाला आहे. त्यामुळे, आजच्या ड्राय रन नंतर फ्रंटलाईन वर्कर्सला लसीकरण केले जाईल. ड्राय रन छोट्या पातळीवर घेतला जाईल म्हणजे त्यात मेसेज जातो का? लसीकरण कोणत्या केंद्रात जाऊन घ्यायचे आहे यासाठीची माहिती ही संबंधित व्यक्तीला मिळाली आहे का अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी हा ड्रायरन असेल. यात काही तांत्रिक अडचणी येतात का हे देखील बघितले जाईल. आणि हा ड्रायरन यशस्वी झाला की फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण सुरू केले जाईल. आम्हाला सांगण्यात आले आहे की जेजे सेंटर फक्त त्यांच्यासाठीच आहे ज्यांना कोवाक्सिन घेण्याची इच्छा आहे आणि जे जे रुग्णालयाच्या कर्मचार्‍यांसाठी ते आहे. आम्ही सर्व फ्रंटलाइन कर्मचार्‍यांना लसीकरण केंद्रांवर मार्गदर्शन करणार आहोत जिथेल कोविशिल्डची व्यवस्था केली गेली आहे तिथेच लसीकरण करुन घ्या.

काकाणी यांनी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन यांचे 2.20  लाख लसीचे डोस उपलब्ध असल्याचे सांगितले असून ज्याचा वापर आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन कामगारांसाठी केला जाईल. आतापर्यंत हा साठा फक्त आरोग्य कर्मचार्‍यांसाठी पुरेसा होता. आरोग्य कर्मचार्‍यांना दुसरा डोस देण्यासाठी सध्याच्या डोसचा वापर करण्याऐवजी त्यांचा उपयोग आरोग्य कर्मचारी आणि अग्रभागी कामगारांना पहिला डोस देण्यासाठी केला जाईल.  “आम्ही कोविन वर अपलोड केलेल्या अग्रभागी कामगारांच्या आकडेवारीच्या आधारे पुढील आठ ते दहा दिवसांत आणखी साठ्याची अपेक्षा करत आहोत.''

राज्य आरोग्य विभाग लसीकरण कार्यक्रमाचा दुसरा टप्पा सुरू करण्यास तयार आहे, पण, हे सर्व केंद्रावर अवलंबून आहे. कारण कोविन अॅपवर दुसऱ्या टप्प्याची यंत्रणा कार्यान्वित करायची आहे. “ को-विन अ‍ॅपमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणींचे पूर्णपणे निवारण झालेले नाही म्हणून आम्ही केंद्रांवर लोकांना‘ वॉक-इन ’करण्यास परवानगी दिली आणि लसीकरण वाढले. केंद्रे ही यंत्रणा कार्यान्वित करतात आणि त्यानंतर आम्ही लसीकरण मोहिमेच्या टप्प्यात पुढे जाऊ शकतो, असे एका आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले.

--------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

bmc organized dry run vaccination frontline employees

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com