मुंबई महापालिकेत किस्सा कुर्सी का! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

मुंबई - शिक्षण आणि स्थायी समिती अध्यक्षपदाच्या आजच्या निवडणुकीत भाजपच्या सदस्यांनी शिवसेनेच्या सदस्यांच्या खुर्च्या पटकावल्याने त्यांनी चिडचिड केली. 

निवडणुकीला गालबोट लागू नये म्हणून शिवसेनेचे सदस्य शेवटच्या खुर्च्यांवर बसले. आजच्या खुर्ची पुराणावरून शिवसेना-भाजपमध्ये महाभारत रंगण्याची शक्‍यता आहे. 

महापालिकेच्या प्रथेनुसार अध्यक्षांच्या उजव्या बाजूला सत्ताधारी बसतात, तर डाव्या बाजूला विरोधक; परंतु आज अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या सर्व सदस्यांनी उजव्या बाजूच्या खुर्च्या पटकावल्या. त्यामुळे शिवसेनेच्या सदस्या नाराज झाल्या. शिक्षण समितीच्या बैठकीत शिवसेनेच्या शीतल म्हात्रे यांनी नाराजी व्यक्तही केली; तर स्थायी समितीतही हाच प्रकार घडला. सभागृह नेते, त्यानंतर शिक्षण समिती अध्यक्ष, त्यांच्यानंतर सर्वच खुर्च्या भाजपच्या सदस्यांनी पटकावल्या. त्यामुळे तेथेही शिवसेनेच्या सदस्यांना दुय्यम आसनांवर बसावे लागले. 

भाजपचे ऍड. मकरंद नार्वेकर यांनी तर कहर केला. ते स्थायी समितीच्या बैठकीला उशिराच आले. त्यांनी आपली खुर्ची शिवसेनेच्या सदस्यांच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला; परंतु शिवसेनेच्या सदस्यांनी त्यांना जागाच दिली नाही. या प्रकारामुळे दोन्ही समित्यांच्या बैठकांमध्ये शिवसेनेच्या सदस्यांची चिडचिड झाली; मात्र निवडणुकीचा दिवस असल्याने शिवसेनेच्या सदस्यांनी जाहीर आक्षेप घेतला नसली तरी आजच्या खुर्ची पुराणावरून महाभारत घडू शकते. 

Web Title: BMC politics shiv sena-bjp