उद्यान हडपण्याचे कारस्थान पालिकेने उधळले 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 सप्टेंबर 2019

अधिकारी, विरोधी पक्षनेत्यांनी घेतली घटनास्थळी धाव 

उल्हासनगर : येथील पालिकेच्या मुख्यालया समोरच पालिकेचे उद्यान आहे. या उद्यानातील झाडांची कत्तल करून उद्यान हडपण्याचा डाव बुधवारी (ता.4) सायंकाळी अधिकारी व विरोधी पक्षनेत्याने उधळला. 

पालिकेच्या समोर सेवादास उद्यान असून गेल्या दोन दिवसांपासून तिथे रेती टाकण्यात आली होती. तसेच तेखील तीन झाडांची कत्तल करून कामाची सुरवात करण्यात येणार होती. पालिकेने लावलेल्या झाडांची कत्तल केल्याचा प्रकार माजी महापौर मिना आयलानी व नगरसेविका गीता साधनानी यांना समजताच त्यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या कडे तक्रार केली. खोट्या कागदपत्राद्वारे उद्यान हडपण्यात येत असल्या बाबत त्यांना सांगण्यात आले होते. 

पालिकेचे उद्यान हडप करण्याचे कारस्थान समजताच शहरात संतापजनक पडसाद शहरात उमटु लागले. त्यामुळे सायंकाळी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या आदेशा नुसार उपायुक्त मदन सोंडे, सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, दत्तात्रय जाधव तसेच विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे तेथे काम करणाऱ्या कामगारांनी तेथुन पळ काढला.

उद्यानातील रेती तसेच इतर साहित्य पालिकेने जप्त केले आहे. तसेच उद्यानातील झाडे तोडणाऱ्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश उपायुक्त मदन सोंडे यांनी दिले आहेत. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bmc save garden for children