esakal | कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमुळं निर्बंध शिथिलतेची शक्यता धूसर - BMC
sakal

बोलून बातमी शोधा

BMC

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमुळं निर्बंध शिथिलतेची शक्यता धूसर - BMC

sakal_logo
By
- समीर सुर्वे

मुंबई : मुंबईतील कोविड परिस्थितीबाबत (Corona Virus) महानगरपालिकेने (BMC) राज्य सरकारला (State Government) अहवाल सादर केला आहे. सध्या मुंबईत कोविडचा संसर्ग (Corona Infection) नियंत्रणात आहे. मात्र, ऑगस्ट मध्ये तिसरी लाट (Corona Second Wave) येण्याची शक्यता लक्षात घेता तुर्तास सध्याच्या नियमांमध्ये सुट मिळण्याची शक्यता कमीच आहे. ‘लॉकडाऊन मध्ये सुट देताना कोविडच्या तीसऱ्या लाटेचा (Corona Third Wave) विचार करावा’असे मत पालिकेच्या वरीष्ठ अधिकाऱ्याने नोंदवले. ( BMC Says Lockdown Will not open fully as Corona Third Wave possibility)

लॉकडाऊन मधून गेल्या महिन्या पासून काही प्रमाणात सुट देण्यात आली आहे. त्यानंतरही मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात आहे. मुंबईत रोज 30 हजाराहून अधिक चाचण्या होत असताना वाढ 0.7 टक्क्यांवर आहे. तर,मृत्यूदरही 1 टक्क्यांच्या खाली आहे. मात्र,आता लॉकडाऊनमध्ये सुट देताना ऑगस्ट महिन्यात तीसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्याचा विचार करण्याची गरज असल्याचे पालिकेचे अधिकारी नमुद करतात. त्यामुळे तुर्तास लॉकडाऊन मध्ये सुट देण्यास पालिकेची तयारी नसल्याचे संकेत मिळत आहे.

हेही वाचा: KDMC : शासकीय जमिनी सुरक्षित राहायला हव्यात - उच्च न्यायालय

मुंबईत 50 टक्क्यांहून अधिक नोकरदार महामुंबईत येतात.तसेच,लोकल प्रवासातही या पेक्षा जास्त प्रमाण असते.त्यामुळे लॉकडाऊन मध्ये सुट देताना मुंबईसह महामुंबईतील कोविड स्थीतीचा विचार करण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले. लॉकडाऊनमध्ये सुट दिल्यास लोकल प्रवासाची मागणी वाढणार आहे. लोकल प्रवासात दाटीवाटीने कोविडचा संसर्ग वाढण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे लॉकडाऊन अधिक शिथील करण्या बरोबरच लोकल प्रवासावरील निर्बंध शिथील करण्यास पालिका प्रशासन प्रतिकूल असल्याचे दिसत आहे.

दोन डोस वाल्यांना सुट

कोविडचे दोन डोस घेतलेल्यांना सुट देण्याची मागणी करण्यात येत आहे.यात लोकल प्रवासासह इतर बाबतीही सुट देण्याचा विचार राज्य सरकारच्या पातळीवर पुढे येत असल्याचे खात्रीलायक समजते.याबाबत दोन दिवसात बैठक होण्याची शक्यता आहे.

loading image