मुंबईतील खड्डयांवर पालिकेचे 113 कोटी खर्च

BMC-Mumbai
BMC-Mumbai

मुंबई : मुंबईतील रस्त्यांवर पडलेले 90 टक्के खड्डे भरल्याचा दावा पालिकेने केला आहे. 1 ऑगस्ट पर्यंत केवळ 414 खड्डे शिल्लक असल्याचं पालिकेच म्हणणं आहे. केवळ खड्डे भरण्यासाठी पालिकेने गेल्या 6 वर्षात तब्बल 113 कोटी रुपये खर्च केल्याचं आरटीआयच्या माध्यमातून उघड झालं आहे.

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद यांनी पालिकेकडे सन 2013 पासून खड्डयांबाबत पालिकेकडे आलेल्या ऑनलाइन तक्रारी आणि त्यावर केलेला खर्च याबाबत माहिती मागितली होती. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार 2013 पासून 31 जुलै 2019 पालिकेकडे खड्ड्यांच्या 24 हजार 146 ऑनलाइन तक्रारी प्राप्त झाल्या. यातील 23 हजार 388 तक्रारींचा निपटारा पालिकेने केला.

तसेच 2013 ते 2019  या कालावधीत मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी एकूण 175 कोटी 51 लाख  86 हजार रुपये आर्थिक तरतूद केली होती. त्यातील 113 कोटी  84 लाख 77 हजार हजार रुपये आतापर्यंत खड्डे भरण्यासाठी खर्च झाले आहेत. एका खड्ड्यावर पालिकेने सरासरी 17 हजार 693 रुपये खर्च केले आहेत.

अंदाजे अंदाजपत्रक आणि वर्षानुसार खर्च :

एप्रिल 2013 ते 31 मार्च 2014 या कालावधीत 46 कोटी 15 लाख 97 हजार रुपये खर्च झाले.

एप्रिल 2014 ते 31 मार्च 2015 पर्यंत या कालावधीत  34 कोटी 16 लाख 92 हजार रुपये खर्च झाले. 

एप्रिल 2015  ते 31 मार्च 2016 पर्यंत या कालावधीत 10 कोटी 61 लाख 27 हजार रुपये खर्च झाले. 

एप्रिल 2016 ते 31 मार्च 2017 या कालावधीत 6 कोटी 94 लाख 97 हजार रुपये खर्च झाले.

एप्रिल 2017 ते 31 मार्च 2018 या कालावधीत 7 कोटी 73 लाख 22 हजार रुपये खर्च झाले.

एप्रिल 2018 ते 31 मार्च 2019 या कालावधीत 7 कोटी 98 लाख 7 हजार.

एप्रिल 2019 पासून आतापर्यंत 14 लाख 35 हजार रुपये इतका खर्च झाला आहे. 

पालिकेने भरलेले खड्डे आणि बाकी खड्डे यात बरीच तफावत आहे.या खड्डयांवर पालिकेने शेकडो कोटी रुपये खर्च केल्या नंतर ही रस्त्यांवर अनेक खड्डे बाकी आहेत.पालिकेने खड्यांबाबतचा तपशील आपल्या संकेत स्थळावर टाकून सार्वजनिक करावा.
- शकील अहमद, आरटीआय कार्यकर्ते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com