Corona Vaccination:दोन शिफ्टमध्ये होणार लसीकरण, पालिकेचा निर्णय

Corona Vaccination:दोन शिफ्टमध्ये होणार लसीकरण, पालिकेचा निर्णय

मुंबई:  कोविन अ‍ॅपच्या अडचणी सुटता सुटत नसताना तिसर्‍या टप्प्यातील लसीकरण वाढवण्यासाठी सर्व लसीकरण केंद्रांत पाळ्यांमध्ये लसीकरण करण्यासाठी पालिका आणि राज्य सरकारने कंबर कसली आहे. त्यामुळे, पालिकेतील लसीकरण केंद्रासोबत राज्यभरातील लसीकरण केंद्रात 2 पाळ्यांमध्ये लसीकरणास सुरूवात करून जास्तीत जास्त नागरिकांना लस देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर, या बातमीला पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दुजोरा दिला असून त्यांनी सांगितले की, टप्प्प्याटप्प्याने दोन पाळ्यांमध्ये लसीकरण सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल.                   
मनुष्यबळाची उपलब्धता, लशींचा पुरवठा, शितसाखळ्यांची सक्षमता आणि त्या जिल्ह्यांमधील संसर्गाचे प्रमाण याचा अभ्यास केल्यानंतर दोन पाळ्यांमध्ये लसीकरणाच्या सुविधेला चालना देण्यात येणार आहे. मुंबईमध्ये आता 29 खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणासाठी मान्यता दिली आहे. हे लसीकरण सशुल्क असले, तरीही काही रुग्णालयांनी वॉक इन पद्धतीने लसीकरण करण्यास संमती दर्शवलेली नाही. मुंबईत ज्येष्ठ नागरिकांची संख्या 12 लाख इतकी आहे. सध्या मुंबईसह राज्यभरात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे, कोरोना संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी तिसर्‍या टप्प्यातील लसीकरण सुरू झाले असले, तरीही त्याचा वेग वाढवण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. लशींच्या उपलब्धतेनुसार पालिका 2 पाळ्यांमध्ये लसीकरणाची प्रक्रिया सुरू करण्याचा विचार करत आहे, तर राज्य सरकराने जिल्हा पातळीवरील मोठ्या रुग्णालयांमध्ये 2 पाळ्यांमध्ये लसीकरणाची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
           
आरोग्य आणि पहिल्या फळीतील कर्मचार्‍यांपैकी काही जणांचे लसीकरण अद्याप झालेले नाही. अधिकाधिक लोकसंख्येचा टप्पा वेगाने गाठण्यासाठी लसीकरण अधिक तप्तरेने व्हायला हवे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या मोठ्या लसीकरण केंद्रामध्ये ही व्यवस्था उपलब्ध आहे, पुरेसे मनुष्यबळ आहे अशा ठिकाणी 2 पाळ्यांमध्ये लसीकरण सुरू करता येईल. मात्र, लसींचा तुटवडा पडणार नाही, मागणीप्रमाणे पुरवठा केला जाईल, असे केंद्र सरकारने सांगितले आहे.
 
पालिकेच्या काही लसिकरण केंद्रात आम्ही आधीपासूनच दोन पाळ्यांमध्ये लसीकरण करत आहोत. मात्र, सरकारच्या सुचनांचे पालन करून सर्व ठिकाणी अशी सुविधा सुरू करू.
डॉ. रमेश भारमल, संचालक, मुख्य पालिका रुग्णालये. 

टप्प्याटप्प्यात सुरू करणार

2 पाळ्यांमध्ये लसीकरण करण्याचा निर्णय टप्प्याटप्प्याने घेतला जाणार आहे. अजून तशी तयारी सुरू आहे. सरकारकडून मार्गदर्शक सूचना आल्या की ते सुरू केले जाईल. पालिका किंवा खासगी रुग्णालयांमध्ये जिथे दोन पाळ्यांमध्ये लसीकरण करणे शक्य असेल तिथे असे करण्याचा विचार आहे.
सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका 

------------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Bmc will be decided start Corona vaccination in two shifts

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com