BMCच्या रुग्णालये, नर्सिंग होमचे फायर ऑडिट होणार; महापौर किशोरी पेडणेकर यांचे निर्देश

BMCच्या रुग्णालये, नर्सिंग होमचे फायर ऑडिट होणार; महापौर किशोरी पेडणेकर यांचे निर्देश

मुंबई  : भंडारा येथील दुर्घटनेनंतर मुंबईतील सर्व रुग्णालये आणि नर्सिंग होमचे फायर ऑडिट होणार आहे. यापूर्वी 2020 मध्ये अशा प्रकारचे ऑडिट झाले होते. 

डिसेंबर 2018 मध्ये अंधेरी येथील कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीनंतर मुंबई अग्निशमन दलाने मुंबईतील रुग्णालयांचे फायर ऑडिट केले होते. 2019 मध्ये झालेल्या ऑडिटनंतर अग्निशमन दलाने फेब्रुवारी 2020 मध्ये विक्रीकर भवनला लागलेल्या आगीनंतर शाळा आणि रुग्णालयांचे फायर ऑडिट केले होते. त्यानंतर आता भंडारा दुर्घटनेनंतर फायर ऑडिट होणार आहे. अग्निशमन दलाला आणि प्रशासनाला मुंबईतील रुग्णालयांचे ऑडिट करण्याचे निर्देश दिले आहेत, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य अग्निसुरक्षा नियमानुसार दर सहा महिन्यांनी सर्व इमारतींनी नोंदणीकृत संस्थेकडून फायर ऑडिट करून घेणे बंधनकारक आहे. त्याचा अहवालही अग्निशमन दलाला सादर करावा लागतो; मात्र असे ऑडिटच होत नसल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. 

महापालिका प्रशासन आणि अग्निशमन दलही गांभीर्याने लक्ष देत नाही. ज्या ठिकाणी नागरिकांची वर्दळ जास्त आहे, त्या इमारती सुरक्षित असल्या पाहिजेत. त्यासाठी ठोस उपाय नियमित कालावधीनंतर करणे गरजेचे आहे. 
- रवी राजा,
विरोधी पक्षनेते, पालिका 

पालिकेची रुग्णालये सुरक्षित? 
नोव्हेंबर 2019 मध्ये परळ येथील केईएम रुग्णालयात ईसीजी मशीनला आग लागून दोन महिन्यांच्या बालकाचा हात जळला होता. त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता; मात्र मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट झाल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश ककानी यांनी सांगितले. 

BMCs hospitals, nursing homes will be fire audited Instructions of Mayor Kishori Pednekar

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com