BMC चे महाबचतीचे सूत्र | कार्यालयीन खर्चातील 300 कोटी वाचवणार

समीर सुर्वे
Saturday, 19 December 2020

कोविड लॉकडाऊनमुळे महापालिकेची आर्थिक कोंडी झालेली असल्याने आता कार्यालयीन खर्चातून 200 ते 300 कोटी रुपये वाचवण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे

मुंबई : कोविड लॉकडाऊनमुळे महापालिकेची आर्थिक कोंडी झालेली असल्याने आता कार्यालयीन खर्चातून 200 ते 300 कोटी रुपये वाचवण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.यात ,वाहाने वापरण्यावर,कार्यालयात नवे फर्निचर करणे,तातडीची गरज नसलेल्या कार्यालयीन खर्चात कपात करण्यात येत आहे. कोविडमुळे महानगर पालिकेने प्रकल्पांचा खर्च 2 हजार 500 कोटी रुपयांनी कमी केला आहे.यात सर्वच महत्वाच्या प्रकल्पांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या निधीला कात्री लावण्यात आली आहे.त्याच बरोबर आता महसुली खर्चावर लगाम लावण्याचा आराखडा तयार करण्याच्या सुचना प्रशासनाने सर्व विभाग प्रमुखांना दिल्या होत्या.त्यानुसार आता 300 कोटी रुपयां पर्यंत बचत करण्याचे टाग्रेट पालिकेने ठेवले आहे.

औषध वितरकांचे आंदोलन सुरूच! निविदा प्रक्रियेत सहभागी न होण्याचा निर्णय

महसुली खर्चात 20 टक्के कपात करण्याच्या सुचना सर्व विभाग प्रमुखांना देण्यात आल्या आहे.त्यात,वेतन,निवृत्ती वेतन यावर कोणताही परीणाम होणार नाही.मात्र,अतिरीक्त खर्चावर मर्यादा आणली जाऊ शकते.असे अतिरीक्त आयुक्त पी वेलारसु यांनी सांगितले.कार्यालयातील काही खर्च टाळता येत नाही.मात्र,काही खर्च टाळता येऊ शकतात.हे खर्च कमी करण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना अनेक वेळा काही कामांसाठी भाड्याची वाहाने पुरवली जातात.त्याचे प्रमाण कमी करता येऊ शकते.तसेच,तातडीचे गरज नसलेले फर्निचर,कार्यालयीन रंगरंगोटी या खर्चावरही मर्यादा आणल्या आहेत.त्याच बरोबर इतर कार्यालयीन खर्चावर मर्यादा आणण्याच्या सुचना सर्व विभाग प्रमुखांना देण्यात आल्या आहेत.

मुंबई परिसरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 

कोविडचा तिजोरीवर परीणाम
 

-प्रकल्पांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या अर्थसंकल्पातील 2 हजार 500 कोटी रुपयांचा निधी कमी करण्यात आला.यात,कोस्टल रोड,गारगाई पाणी पुरवठा प्रकल्प अशा महत्वाच्या प्रकल्पांसह सर्वच प्रकल्पांचा समावेश आहे.
-या वर्षी आवश्‍यक असलेल्या प्रकल्पांसाठी निवीदा काढण्याचे निर्देश देण्यात आले आहे.जी कामे तातडीची नसतील त्यांच्या निवीदा काढण्याची घाई करु नये.
- निवीदेचा अंदाज पत्रकाचा मसुदा तयार करताना फक्त प्रकल्पाचा खर्च नमुद न करता त्या बरोबर असलेले विविध कर आणि शुल्कांसह खर्च नमुद करावा.जेणेकरुन खर्चांचा संपुर्ण अंदाज येईल.

BMCs saving formula It will save Rs 300 crore in office expenses

-------------------------------------------------------------- 

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BMCs saving formula It will save Rs 300 crore in office expenses