बीएमएस सत्र 6 चा निकाल जाहीर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जून 2019

मुंबई : मुंबई विद्यापीठाने मे महिन्यात घेतलेल्या उन्हाळी सत्रातील बीएमएस सत्र 6 चा निकाल जाहीर केलेला आहे. या परीक्षेत 9 हजार 217 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची टक्केवारी 78.74 टक्के एवढी असून विद्यापीठाने हा निकाल 40 दिवसांच्या आत जाहीर केला आहे. या निकालासह आजपर्यंत विद्यापीठाने 84 परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. 

या परीक्षेसाठी विद्यापीठाकडे 14 हजार 195 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 14 हजार 156 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या निकालात 9 हजार 217 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेचा निकाल 40 दिवसांच्या आत विद्यापीठाने जाहीर केला आहे. मागील वर्षीही विद्यापीठाने बीएमएसचा निकाल वेळेत जाहीर केला होता. 

बीएमएस सत्र 6 च्या परीक्षेमध्ये तपासणीसाठी 75 हजार 152 उत्तरपत्रिका होत्या. या उत्तरपत्रिका 2 हजार 298 शिक्षकांनी तपासल्या. तर 23 हजार 589 उत्तरपत्रिकांचे मॉडरेशन करण्यात आले. या सर्व उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन व मॉडरेशन ऑनस्क्रीन मार्किंग पद्धतीने झाले आहे. परीक्षेचा निकाल विद्यापीठाच्या www.mumresults.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BMS semister 6 result declares