बोर्डी : खुटखाडी पुलाच्या नुतनीकरणासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर

अच्युत पाटील
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

बोर्डी - बोर्डी-घोलवड गावाला जोडणाऱ्या झाई-रेवस-रेड्डी सागरी महामार्गावरिल खुटखाडी पुलाच्या नुतनीकरणासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभागिय अभियंत्ता टी.आर.खैरनार यांनी सकाळला सांगितले. सकाळ दैनिकातुन सातत्याने पाठपुरावा केला होता याची आठवण देखील खैरनार यांनी करुन दिली.

सुमारे ऐशी वर्षा पुर्वी बांधण्यात आलेल्या खुटखाडी पुलाची 26 जुन 2001ला झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुरामध्ये दुरावस्था झाली होती. दोन्ही बाजूंनी संरक्षक कठडे तुटले होते. तर पिलर आणि स्लॅब कोसळण्याच्या अवस्थेत आली होती.

सकाळ दैनिकातुन या विषयावर सातत्याने पाठपुरावा केल्याने ठाणे जिल्हा परिषदेचे तात्कालीन बांधकाम सभापती विजय म्हात्रे यांनी प्रयंत्न करुन पुलाच्या नुतनिकरणासाठी  2013 मध्ये सत्तर लक्ष रुपयाचा निधी मंजूर करून घेतला होता. मात्र दोन ठेकेदारांच्या स्पर्धेत आणि अधिकाऱ्यांच्या टक्केवारीच्या वादात कामात प्रगती झाली नाही.

2016 मध्ये ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरानंतर पालकमंत्री विष्णु सावरा, तात्कालीन खासदार चिंत्तामण वनगा, आमदार पास्कल धनारे यांनी खुटखाडी पुलाची पहाणी करुन तातडीने नुतनीकरण करुन घेण्याचे आदेश दिले. मात्र लाल फितित अडकलेल्या या पुलाच्या कामाला मुहुर्त मिळत नव्हता. 2017 मध्ये बोर्डीचे नागरीक विजय खरपडे यांच्याकडे पालघर जिल्हा परिषदेचा अध्यक्षपदाचा कार्यभार आल्यावर खुटखाडी पुलाच्या नुतनिकरणाच्या कामाच्या प्रस्तावाला प्राधान्य दिले. खास निधीतुन दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या कामी सकाळ दैनिकातून सातत्याने पाठपुरावा केला होता. लवकरच प्रशासकिय प्रक्रिया पुर्ण करुन कामाला सुरुवात केली जाईल असे खैरनार यांनी सांगितले.

Web Title: Board: Approval of Rs. Two Crore Fund for Renewal of Khatakhadi Bridge