बुडालेली बोट वरसोली समुद्रकिनारी

तुटलेली बोट वरसोली समुद्रकिनाऱ्यावर आली आहे.
तुटलेली बोट वरसोली समुद्रकिनाऱ्यावर आली आहे.

मुंबई : कुलाबा किल्ल्याजवळील एका खडकावर मासेमारीसाठी निघालेली करंजा येथील बोट आदळली. त्यामध्ये बोटीला भगदाड पडून बोट बुडाली; परंतु बोटीतील आठ खलाशांनी डिझेलचे ड्रम व बोयांच्या मदतीने वरसोली किनारा गाठला. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. ही बोट लाटांसोबत वरसोली समुद्रकिनाऱ्यावर आली. बोटीचा एक भाग पूर्णपणे तुटला असून त्यातील फायबर व लाकडाचे भाग निघाले आहेत. 

उरण तालुक्‍यातील करंजामधील नवापाडा येथील सुरेखा राजेश नाखवा यांच्या मालकीची ‘नमो शिवाय’ या नावाची बोट आहे. १ ऑगस्ट रोजी सकाळी चार वाजण्याच्या सुमारास आठ खलाशांसह बोट मासेमारीसाठी करंजा येथून मुरूडकडे निघाली. 
चावुखादी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या खोल समुद्रात १२ नॉटिकल मैलाच्या पलीकडे अचानक बोटीचे इंजिन बंद पडले. कुलाबा किल्ल्यापासून दोन कि.मी. अंतरावर सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. वादळी वाऱ्यामुळे बोट खडकावर आदळली. त्यामुळे बोटीमध्ये समुद्रातील पाणी हळूहळू शिरू लागले. बोट बुडणार असल्याचे लक्षात आल्यावर खलाशांनी जीव वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. 

बोटीतील वॉटरप्रुफ जॅकेट घालून तसेच डिझेलच्या रिकाम्या ड्रम व बोयांच्या मदतीने साडेतीन किलोमीटरचा पाण्यातील प्रवास करीत खलाशांनी वरसोलीमधील किनारा गाठला. या बोटीतील खलाशी वसंत बामा पाटील, धावू गोविंद तांडेल, गजानन अर्जुन जोशी, नितीन जनार्दन ठाकूर, उमाजी बालाजी पाटील, रूपेश जनार्दन पाटील, नारायण मंगल्या कोळी, परशुराम शांताराम पाटील वरसोली समुद्रकिनारी पोहचले. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून समुद्रात असलेली बोट लाटांमुळे समुद्रकिनारी आली. बोटीचा एक भाग पूर्णपणे तुटला असून त्यातील फायबर व लाकडाचे भाग निघाले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com