बोटींच्या तोडकामाचा गोरखधंदा; तेलगळतीमुळे समुद्री जीवांवर परिणाम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Boat-breaking Effects of oil spills marine life Mumbai Port traffic jam mumbai

बोटींच्या तोडकामाचा गोरखधंदा; तेलगळतीमुळे समुद्री जीवांवर परिणाम

मुंबई : एकीकडे सरकारकडून जलवाहतुकीला प्रोत्साहन दिले जात असताना मुंबई पोर्ट ट्रस्टच्या भोंगळ कारभारामुळे मुंबईतील समुद्री जीवांची सुरक्षा धोक्यात आली आहे. रे रोड येथील दारूखाना धक्क्यावर सुरू असलेल्या बोटींच्या बेकायदा तोडकामातून तेलगळतीमुळे समुद्रातील पर्यावरणाची मोठी हानी होत असल्याचे पुरावे ‘सकाळ’च्या हाती लागले आहे. दरम्यान, हा प्रकार गंभीर असून याची चौकशी केली जाईल, असे आश्वासन मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अध्यक्षांनी दिले. मुंबईतील वाहनांची वाढती संख्या, त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे सरकारकडून जलवाहतुकीला प्रोत्साहन दिले जात आहे. त्यानुसार महामुंबईत अनेक ठिकाणी धक्क्यांची उभारणी करण्यात आली. त्यावरून सध्या मुंबईतील विविध मार्गांवर २०० पेक्षा अधिक फेरीबोटी चालतात.

परवानगीच्या नावाखाली हप्तेवसुली!

बोटी तोडण्यासाठी नियमानुसार मुंबई पोर्ट ट्रस्टकडून परवानगीसह बोटी तोडताना प्रदूषण होणार नाही, याचीही काळजी घ्यावी लागते. परवानगी मिळाल्यानंतर उरण, करंजा येथे बोटी तोडण्यात येतात; मात्र काही वर्षांपासून हे काम या धक्क्यावर केले जात आहे. ही परवानगी देण्यासाठी पोर्ट ट्रस्टचे अधिकारी हप्ते घेत असल्याचे एका बोटमालकाने ‘सकाळ’ला दिली.

दारूखाना धक्क्यावर सुरू असलेला हा प्रकार गंभीर आहे. आम्ही तत्काळ अधिकाऱ्यांचे एक पथक पाठवून चौकशी करणार आहोत.

- राजीव जलोटा, अध्यक्ष, मुंबई पोर्ट ट्रस्ट

बोटीच्या देखभालीसाठी धक्क्यावर जागा दिली आहे; मात्र तिथे बेकायदा फिशनग बोटी लागत असल्याने आमच्या बोटीला जागा मिळत नाही.

- इकबाल मुकादम, अध्यक्ष, गेटवे-एलिफंटा जलवाहतूक संस्था

- नितीन बिनेकर

Web Title: Boat Breaking Effects Of Oil Spills Marine Life Mumbai Port Traffic Jam Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..