सुरक्षेसाठी नौकांना ‘क्यूआर कोड’

सुरक्षेसाठी नौकांना ‘क्यूआर कोड’

अलिबाग ः रायगड जिल्ह्यातील सागरी किनाऱ्यांचा देशविघातक कारवाया आणि तस्करीसाठी वारंवार गैरवापर झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर तटरक्षक दल, सागरी पोलिस आदी सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहे. त्यांनी आता समुद्रात प्रत्येक संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली असून या मोहिमेचा विशेष भाग म्हणून प्रत्येक मच्छीमाराची तपासणी करण्यात येत आहे. मासेमारी नौकांवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. विशेष माहिती नौकांची माहिती क्षणात मिळावी यासाठी क्‍यूआर कोड प्रणाली सुरू करण्यात येणार आहे.

१९९३ मध्ये झालेले मुंबई बॉम्बस्फोट आणि २६/११ चा दहशतवादी हल्ला या दोन्ही विघातक कारवाया सागरी मार्गाने झाल्या होत्या. त्यामुळेच सागरी सुरक्षेचे महत्त्व जाणून केंद्र आणि राज्य सरकारने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यानुसार धोका कमी करण्यासाठी मच्छीमारांना बायोमेट्रिक ओळखपत्रे देण्यात येत आहेत. मच्छीमारांची नोंदही करण्यात येत आहे. 

सागरी मार्गाने घातपाताचा प्रयत्न होऊ नये यासाठी सुरक्षा यंत्रणा दक्षता घेत आहेत. त्यानुसार मासेमारी 
नौकांवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. नौका कोणाच्या मालकीची आहे, त्यावर काम करणारे कामगार कोण 
आहेत आदी माहिती क्षणात मिळावी यासाठी क्‍यू आर कोड प्रणाली सुरू करण्यात येणार आहे.
मच्छीमारांना ओळखपत्राची प्रतीक्षा रायगड जिल्ह्यात ४८ हजार ७११ मच्छीमार आहेत. जुलैअखेरपर्यंत यापैकी ३८ हजार ८०२ जणांना बायोमेट्रिक ओळखपत्र मिळाले आहेत. उर्वरित या ओळखपत्राच्या प्रतीक्षेत आहेत.
परप्रांतीय मच्छीमारांचीही नोंदणी बायोमेट्रिक ओळखपत्र या मोहिमेचा प्रत्येक मच्छीमाराने लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक मत्सव्यवसाय आयुक्त कार्यालय रायगड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

खोल समुद्रात मासेमारी करताना यातील काहीजण चुकून दुसऱ्या देशाच्या हद्दीत प्रवेश करतात. अशा वेळेला त्यांच्याकडे स्वतःची बायोमेट्रिक ओळख आणि त्यांची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाकडे असणे आवश्‍यक होते.
- अभयसिंह शिंदे-इनामदार, सहा. मत्स्यव्यवसाय आयुक्त, रायगड

रायगड जिल्ह्यातील बंदरांत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ओळख पटावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने अन्य पर्याय शोधून पोलिस दक्षता बाळगत आहेत.
- बाळकृष्ण जाधव, पोलिस निरीक्षक, सुरक्षा शाखा रायगड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com