बेपत्ता मुलाचा मृतदेह सापडला पाच दिवसांनी

बेपत्ता मुलाचा मृतदेह सापडला पाच दिवसांनी

मुंबई : लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्या वेळी बोट उलटल्याने बेपत्ता झालेल्या पाच वर्षीय मुलाचा मृतदेह शनिवारी राजभवनच्या मागील बाजूस समुद्रात सापडला. साईश जयेश मर्दे (5) असे त्याचे नाव आहे. डी. बी. मार्ग पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. 

अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लालबागच्या राजाचे विसर्जन होते. विसर्जनाकरता मोठ्या संख्येने बोटी गिरगावच्या चौपाटीवर नांगरून ठेवलेल्या असतात. बोटीच्या मदतीने मोठ्या तराफ्यात बाप्पाची मूर्ती खोल समुद्रात नेली जाते. नालासोपाराचा रहिवासी असलेला साईश हा कुटुंबीयांसोबत लालबागच्या राजाचे विसर्जन पाहण्याकरता आला होता. सोमवारी साईश आईसह एका बोटीत बसला होता. विसर्जन सुरू असतानाच बोट कलंडली होती. क्षमतेपेक्षा जास्त लोक बोटीत होते.

बोट उलटल्यावर अन्य बोटीवरील तरुणांनी चौघांचे प्राण वाचवले होते. मात्र साईश बेपत्ता झाला होता. तेव्हापासून नौदल, तटरक्षक दल, हवाई दलाचे जवान त्याचा शोध घेत होते. त्याकरिता डी. बी. मार्ग पोलिसांनी एक पथकही तयार केले होते. दरम्यान, शनिवारी सकाळी राजभवन परिसरात शोधमोहीम सुरू असतानाच साईशचा मृतदेह आढळून आला. नातेवाईकांमुळे साईशची ओळख पटली. पोलिसांनी साईशचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनाकरता पाठवला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com