उल्हासनगरमधील वालधुनी नदीत आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

उल्हासनगरातील वालधुनी नदीत एका 55 वर्षीय महिलेचा मृतदेह आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मिळाला. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला असून, मृतदेहाला शवविच्छेदनासाठी शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आले.

उल्हासनगर : उल्हासनगरातील वालधुनी नदीत एका 55 वर्षीय महिलेचा मृतदेह आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मिळाला. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला असून, मृतदेहाला शवविच्छेदनासाठी शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आले.

विविध पूजा होणाऱ्या हिराघाटच्या पुलाखालून एका महिलेचा मृतदेह वाहत बाहेर आल्यावर नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. यावेळी हिराघाटच्या पुलावर खूप गर्दी उसळली होती. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आला आहे. प्रथमदर्शनी पाहिले असता महिलेच्या अंगावर कोणत्याही जखमा किंबहुना संशयित असे काही आढळले नाही. परवा सायंकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. तेव्हा ही महिला नदीत पडली असावी, कुणी एखादी महिला मिसिंग झाली आहे काय तशी चौकशी करण्यात येत आहे.

शवविच्छेदन अहवालात काय आहे, याकडेही पोलिसांचे लक्ष लागले आहे. महिलेची ओळख पटली नसल्याने मध्यवर्ती पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल भिसे, उपनिरीक्षक दीपक दाभाडे यांनी ही माहिती दिली.

Web Title: The body of a woman found in Ulhasnagars Waldhun river