बनावट बटरचा साठा जप्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

मीरा रोड - काशीमिरा भागात सुरू असलेल्या बनावट अमूल कंपनीच्या बटरच्या कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकून पाच जणांना अटक केली. सहायक पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना सूत्रांकडून याबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

घोडबंदर गावाजवळच्या औद्योगिक वसाहतीतील एका गाळ्यामध्ये बनावट बटर तयार करण्याचा कारखाना सुरू होता. पोलिसांनी या जागेवर छापा टाकून तब्बल एक हजार किलो बनावट बटरचा साठा जप्त केला.

कारखान्यात तयार होत असलेले बटर अमूल कंपनीच्या वेष्टनात पॅकबंद केले जात होते. दरम्यान, आता सदर कारखाना बंद करण्यात आला असून अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पुढील तपासणी सुरू केली आहे. मात्र, आता याबाबत परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. याबाबत स्थानिक पोलिस, पालिका प्रशासनाला माहिती नसल्यामुळे आश्‍चर्य व्यक्‍त करण्यात येत आहे.

Web Title: Bogus Amul Company Butter Seized Crime