
बॉलिवूडमध्ये दरवर्षी अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर येतात. काही लोकांच्या पसंतीला पडतात तर काहींकडे दर्शक पाठ फिरवतात. अशात २०२० हे वर्ष मनोरंजनानी भरगच्चं असंच असणार आहे. दर वर्षी अनेक सिनेमांचे रिमेक येत असतात काही सिनेमांचे सिक्वल देखील येतात. २०२० मध्ये अनेक चित्रपटांचे सिक्वल येणार आहेत. चला एक नजर टाकुयात तुम्हा आम्हाला मनोरंजनाचा डोस पाजायला येणाऱ्या सिक्वल सिनेमांवर.
सडक २
बॉलिवूडमध्ये दरवर्षी अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर येतात. काही लोकांच्या पसंतीला पडतात तर काहींकडे दर्शक पाठ फिरवतात. अशात २०२० हे वर्ष मनोरंजनानी भरगच्चं असंच असणार आहे. दर वर्षी अनेक सिनेमांचे रिमेक येत असतात काही सिनेमांचे सिक्वल देखील येतात. २०२० मध्ये अनेक चित्रपटांचे सिक्वल येणार आहेत. चला एक नजर टाकुयात तुम्हा आम्हाला मनोरंजनाचा डोस पाजायला येणाऱ्या सिक्वल सिनेमांवर.
सडक २
तब्ब्ल १९ वर्षानंतर संजय दत्त आणि पूजा भट यांचा सडक सिनेमा सिक्वलच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १९९१ मध्ये महेश भट यांनी सडक हा सिनेमा बनवला होता. २०२० मध्ये देखील महेश भट हेच सडक-२ बनवणार आहेत. यामध्ये आलिया भट पहिल्यांदाच तिच्या वडिलांसोबत काम करणार आहे. याचसोबत आलिया पहिल्यांदाच आपली बहीण पूजा भट सोबत स्क्रिन शेअर करताना पाहायला मिळेल.
दोस्ताना २
दिग्दर्शक तरुण मंसुखानीच्या 'दोस्ताना' या सिनेमात अभिषेक बच्चन आणि जॉन अब्राहाम प्रेक्षांच्या भेटीला आले होते. दर्शकांना त्यांचं काम पसंतीला देखील पडलं होतं. या सिनेमात प्रियांका चोप्रा देखील होती. आता याच दोस्तानाचा सिक्वल 'दोस्ताना २' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये कार्तिक आर्यन, लक्ष लालवाणी आणि जान्हवी कपूर काम करणार आहेत.
मोठी बातमी - मनसे-भाजप युतीबद्दल देवेंद्र फडणवीसांनी सोडलं मौन, म्हणालेत..
भूल-भुलय्या २
फिल्ममेकर प्रियदर्शन चा 'भूल-भुलय्या' लोकांच्या चांगलाच पसंतीला पडला होता. आजही लोकांना हा सिनेमा पाहायला आवडतो. यामध्ये विद्या बालन, अक्षय कुमार आणि शायनी अहुजा हे मुख्य भूमिकांमधून प्रेक्षकांच्या समोर आलेले. आता याच 'भूल-भुलय्या' सिनेमाचा पुढचा भाग म्हणजेच सिक्वल येणार आहे. अनीस बज्मी हे या सिनेमाचं दिग्दर्शन करतायत. यामधून कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.
अंग्रेजी मिडीयम
२०१७ मध्ये इरफान खानचा 'हिंदी मिडीयम' हा सिनेमा प्रेक्षांच्या भेटीला आला होता. आता याचाच सिक्वल 'अंग्रेजी मिडीयम' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन होमी अदजानिया करतायत. या चित्रपटात इरफान खान सोबत करीना कपूर आणि राधिका मदान स्क्रिन शेअर करणार आहेत. या सिनेमाचं बरंचसं शूट राजस्थानमध्ये झालंय.
स्ट्रीट डान्सर ३-डी
'स्ट्रीट डान्सर ३डी' हा सिनेमा 'एबीसीडी' सीरीजमधील तिसरा चित्रपट आहे. रेमो डिसूजाने याचं दिग्दर्शन केलंय. या सिनेमात वरुण धवन, श्रद्धा कपूर, प्रभु देवा आणि नोरा फतेही काम करतायत. या चित्रपटासाठी कतरीना कैफ ला विचारण्यात आलं होतं. मात्र कतरीना दुसऱ्या सिनेमांमध्ये व्यस्त असल्याने श्रद्धा कपूरला फायनल केलं गेलं.
'शुभ मंगल ज्यादा सावधान'
लैंगिक समस्येवर आधारित शुभ मंगल सावधान हा आयुष्मान खुराना आणि भूमी पेडणेकरचा सिनेमा २०१७ मध्ये आला होता. आता या सिनेमाचा सिक्वल येणार आहे. हितेश केवल्य या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. या सिनेमाचं नाव 'शुभ मंगल ज्यादा सावधान' असं असणार आहे.
Inside Story - असा अडकला एजाज लकडावाला पोलिसांच्या जाळ्यात..
'बागी 3'
'बागी', 'बागी 2' च्या यशानंतर आता 'बागी 3' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात टायगर श्रॉफ, श्रद्धा कपूर यांच्यासोबत रितेश देखमुख आणि दिशा पाटनी दर्शकांच्या भेटीला येतील. बागी ३ चं शूटिंग सध्या सुरु आहे.
'आज कल'
इम्तियाज अलीचा 'लव्ह आज कल' मध्ये सैफ अली खान आणि दीपिका प्रेक्षकांच्या समोर आले होते. आता दिग्दर्शक याच सिनेमाचा सिक्वल 'आज कल' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये कार्तिक आर्यन आणि सारा अली खान स्क्रीन शेअर करताना पाहायला मिळतील. पहिल्यांदाच कार्तिक आर्यन आणि सारा एकमेकांसोबत काम करताना पाहायला मिळतील. या सिनेमाचं अधिकृत नाव अद्याप ठरलेलं नाही. मात्र हा सिनेमा 'आज कल' या नावाने समोर येईल अशी चर्चा आहे.
'हंगामा 2
प्रियदर्शन चा हंगाम लोकांना फारच आवडला होता. अक्षय खन्ना, रिमी सेन आणि आफताब शिवदासानी यांच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं होतं. अशातच २०२० मध्ये याच सिनेमाचा सिक्वल येणार आहे. याचं नाव आहे हंगामा २. या सिनेमात मिजान जाफरी, प्रणिता सुभाष, परेश रावल आणि शिल्पा शेट्टी प्रेक्षकांच्या भेटीला येतील.
आता येऊ घातलेले हे सिक्वल सिनेमे प्रेक्षकांना किती भुरळ घालतात आणि बॉक्स ऑफिसवर किती पैसे छापतात हे येणार काळच सांगेल.
Bollywood 2020 these squeals will his silver screen in this year